मिसळ म्हटलं, की आपोआपच आपल्या जिभेवर पाणी येतं. तिखट आणि झणकेदार तर्री खाताना मिळणारा आनंद खवैय्यांना मोहीत करून टाकतो. महाराष्ट्रात प्रत्येक गावाची स्पेशल मिसळ आहे़; पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत कुठेही जा, मिसळचा सर्वत्र कायम आहे, हे मात्र नक्की..!
त्याचप्रकारे नाशिकच्या मिसळची महाराष्ट्रात एक वेगळीच ओळख आहे. नाशिकला ‘मिसळ पायोनीअर’ देखील म्हणतात. नाशिकमध्ये विविध प्रकारची मिसळ मिळते. अस्सल गावरान काळा रस्सा, हिरव्या मुगाची हिरव्या रस्स्यासोबत मिळणारी मिसळ, कुठे चुलीवरची, तर कुठे बार्बीक्यूची. पण, मिसळ कुठलीही असो, नाशिककर मात्र मिसळीवर आवर्जून ताव मारतात.








Esakal