न्यूयॉर्क : अमेरिकन शेअर मार्केटमध्ये IPO आल्यानंतर Confluent कंपनीने पहिल्याच दिवशी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे पुण्यात वाढलेल्या नेहा नारखेडे ही मराठी तरुणी या कंपनीची Co-Founder आहे. कर्तृत्वाच्या जोरावर टेक्नोक्रॅट किंवा तंत्रज्ञान क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या उद्योजिकेची कथा आजच्या तरूणींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

अमेरिकेतल्या नॅस्डॅक (Nasdaq) या शेअर मार्केटमध्ये कॅलिफोर्नियामधील कॉन्फ्लुएंट (Confluent IPO) कंपनीचे गुरुवारी (ता.24) लिस्टींग झाले. यावेळी कंपनीच्या एका शेअरची 36 डॉलर्स होती. शेअर मार्केंटमध्ये पहिल्याच दिवसाच्या अखेरीस कॉन्फ्लुएंटच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये साधारण 25 टक्क्यांनी वाढली असून एका शेअर्सची किंमत 45.02 डॉलर इतकी झाली आहे. या कंपनीने आयपीओमार्फत (IPO) 828 दशलक्ष डॉलर उभारले असून कंपनीचं मूल्यांकन (Evaluation of the company) 9.1 अब्ज डॉलर इतकं झालं आहे.

पुरषी वर्चस्व असलेल्या तंत्रज्ञान सारख्या क्षेत्रात भरारी घेणाऱ्या नेहाचं सर्वांनाच कौतूक वाटतं आहे. 2019 मध्ये ‘फोर्ब्ज’ने प्रकाशित केलेल्या ‘अमेरिकेतल्या सर्वांत श्रीमंत सेल्फ-मेड महिलां’च्या यादीत नेहाचं नावही झळकलं होतं. तेव्हा ती लक्षाधीश होती आता मात्र तिने अब्जाधीश होण्याची वाटचाल सूरू केली आहे.

‘फोर्ब्ज’ने दिलेल्या वृत्तानुसार, कॉन्फ्लुएंटचे को- फाऊंडर जय क्रेप्स, नेहा नारखेडे आणि जून राव हे तिघे लिंक्डइन (LinkedIn) या प्रसिद्ध आणि व्यापक प्रोफेशनल नेटवर्क कंपनीचे कर्मचारी होते. लिंक्डइनवर प्रचंड प्रमाणात येणारे मेसेजेस, नेटवर्क रिक्वेस्ट्स आणि प्रोफाइल व्ह्यूज यांच्या व्यवस्थापन सोपे करण्यासाठी त्यांनी क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित असलेलं एक टेक्निकल टूल 2011 मध्ये विकसित केलं होतं. मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या एवढ्या प्रचंड डेटाचं व्यवस्थापन (Data Management) Linkedin सह इतर कंपन्यांसाठीही मोठी समस्या असू शकते हे तिघांच्या लक्षात आले. त्यावर उपाय शोधताना त्यांनी क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित ओपन सोर्स सॉफ्टवेअर (Open Source Software) निर्माण केलं आणि 2014 मध्ये त्याकरिता कॉन्फ्लुएंट नावाची कंपनी उभारली. नेहा नारखेडे ही त्या कंपनीची सहसंस्थापक आणि चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर (CTO) म्हणजेच तंत्रज्ञानविषयक मुख्य अधिकारी आहे.

पुण्याची नेहा कशी झाली अमेरिकेतली कोट्यधीश

8 वर्षाची असल्यापासून नेहा कॉप्युटर हाताळत आहे. भारतातच असताना नेहाने तंत्रज्ञान क्षेत्रातच अभ्यास करण्याचे ठरविले आहे. त्यानंतर अमेरिकेतील जॉर्जिया युनिव्हर्सिटीतून 2006 मध्ये तिने कॉम्प्युटर सायन्स करत पदवी शिक्षण पुर्ण केले. नेहाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिची लिंक्डइन कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून निवड झाली. येथेच 2 सहकाऱ्यांसोबत नेहाने कॉन्फ्लुएंट कंपनीची स्थापना केली. कॉन्फ्लुएंट या कंपनीचे आजचे भांडवली बाजारमूल्य(The capital market value of the company) 11.4 अब्ज डॉलर झालेल्या या कंपनीच्य 3 को-फाऊंडरपैकी दोघे बिलेनियअर झाले ती तिसरी को-फाऊंडर नेहा नारखेडे ही मराठी मुलगी असून ती देखील अब्जाधीश होण्याच्या वाटेवर आहे. कंपनी सुरु झाल्यापासून 7-8 वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांना हे यश मिळवलं आहे आहे.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here