मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. १५ वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीमध्ये आमिरने त्याच्या आणि किरणच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले होते, जाणून घेऊयात त्यांच्या हटके लव्हस्टोरीबाबत….

आमिर आणि किरण यांची भेट 2001 मध्ये ‘लगान’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. या चित्रपटात किरण सहाय्यक दिग्दर्शकाचं काम करत होती.
आमिर आणि त्याची पत्नी रिनाचा 2002 मध्ये घटस्फोट झाला. त्याच काळात आमिर किरणसोबत फोनवर बोलला होता.
तेव्हा ते दोघे फक्त अर्धा तास एकमेकांसोबत बोलले होते.
किरणसोबत बोलत असताना आनंदी असल्याचं आमिरला त्यावेळी जाणवलं.
जवळपास एक-दीड वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आमिर आणि किरणने २००५ मध्ये लग्नागाठ बांधली.
आमिर आणि किरणला आझाद नावाचा मुलगादेखील आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here