जळगाव ः किमान आधारभूत किंमतीत भरडधान्य खरेदी (Coarse grains) योजनेंतर्गत केन्द्र शासनाकडून जिल्ह्याला २५ हजार ५००क्विंटल ज्वारी, २ हजार २४० क्विंटल गहू (Wheat) खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यानुसार जिल्हयात १७ केंद्रावर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी (Farmer) केवळ ९६९ (जेमतेम १८ टक्के )शेतकऱ्यांकडील भरडधान्याची खरेदी ३० जूनपर्यंत करण्यात आली. उद्दिष्टासह मुदत संपूष्टात आल्याने किमान आधारभूत किंमत भरडधान्य खरेदी प्रक्रिया बंद झाली आहे. त्यामुळे अजूनही काही शेतकर्‍यांकडे शेतमाल शिल्लक असून हमीभाव योजनेपासून वंचीत राहणार आहेत. (eighteen per cent of the farmers bought coarse grains)

Also Read: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोदीच्या प्रतिमेवर शाई फेकली!

जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाकडून किमान आधारभूत किंमत योजना लागू असल्याने केळी, उस वा अन्य दिर्घ मुदतीच्या बागायती उत्पन्नाऐवजी कमी वेळेत बागायती उत्पन्न घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढत आहे. यंदा ज्वारी मका, गहू उत्पादनासाठी आधारभूत किंमतीत धान्य खरेदीसाठी १० एप्रिलपासून ऑनलाईन नोंदणी झाली. त्यानुसार ज्वारीसाठी १० हजार ६७९, मका ६ हजार ५७४ तर गव्हासाठी ७६ शेतकऱ्यांकडून ऑनलाईन नोंदणी झाली होती. त्यानुसार जिल्ह्यातील १७ केंन्द्रावर ८ जून पासून ३० जून दरम्यान भरडधान्य खरेदी झाली. नोंदणी केलेल्या १७ हजार ३२९ शेतकर्‍यांपैकी फक्त ९६९ शेतकर्‍यांचा गहू, मका आणि ज्वारीची खरेदी करण्यात आली. भरडधान्य खरेदीची मुदत ३० जूनपर्यत होती. शिवाय खरीप पेरणीच्या कामात बहूतांश शेतकरी व्यस्त आहेत. त्यामुळे नोंदणी करूनही अन्य शेतकरी हमीभाव योजनेच्या लाभापासून वंचीत राहणार आहेत.

Grain market

शेतमाल– हमीभाव– उद्दीष्ट (क्विं.)– नोंदणी—- शेतकरी– खरेदी (क्विं.)
ज्वारी–२६२०–२५ हजार ५००—१० हजार ६७९–८१७–२४ हजार ३५८
मका–१८५०— ६ हजार ५७४–१२३– ५ हजार ३४४
गहू–१९७५— २ हजार २४०— ७६–२९–५९८
एकूण–१७ हजार ३२९–९६९—३० हजार ३००

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here