आळेफाटा : पुणे – अहमदनगरच्या हद्दीवर असलेल्या आळे खिंडीमध्ये मालवाहू टेंम्पो खड्डयात पलटी झाल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडले. पुणे नाशिक महामार्गावर आळेफाटा परिसरात टेम्पो पलटी झाला. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Tempo accident the border of Ahmednagar- Pune)

Also Read: पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात सध्याचेच निर्बंध लागू : उपमुख्यमंत्री

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे-नाशिक महामार्गावर पुणे- अहमदनगरहद्दीवर असलेल्या आळेखिंडीमध्ये (ता.जुन्नर)या ठिकाणी हा अपघात झाला आहे. नाशिकहून पुण्याकडे टेंम्पो (एम एच.१५ सी.के.४३२९ )ला पाठीमागून वेगात येणाऱ्या वाहनाला साईट देताना रस्त्याच्या बाजुला असलेल्या खड्यात पलटी झाला. यामध्ये टेंम्पोचे नुकसान झाले तर चालकासह दोन जणांना कोणतीही इजा झाली नाही. दरम्यान या पुणे-नाशिक महामार्गाचे काम अर्पूण असून ठिक-ठिकाणचे चौपदरीकरणाचे काम करताना ते पूर्ण झालेले नसल्याने या मार्गावर वारंवार अपघात होत आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here