नागपूर : महाराष्ट्रात २३ जून २०१८ पासून प्लास्टाकी बंदी लागू करण्यात आली. जो प्लास्टीक बंदीच्या नियमांचे उल्लंघन करेल त्याच्याविरोधात कारवाई देखील करण्यात येणार होती. पण, आजवर सरकारला प्लास्टिक बंदीवर पूर्णपणे यश मिळवता आलेलं नाही. आज आंतरराष्ट्रीय प्लास्टीक प्रतिबंध दिवस असूनही आजच्या दिवशी अनेकजण प्लास्टीकचा सर्रास वापर करताना दिसत आहेत. मग चला तर पाहुयात आजच्याच दिवशी ‘सकाळ’च्या छायाचित्रकाराने टिपलेली काही दृश्य –

1999 पासून आजवर चार वेगवेगळ्या नियमांद्वारे केंद्र आणि राज्य सरकारने प्लास्टिकबंदी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण, अजूनही ही प्लास्टीक बंदी पूर्णपणे झालेली नाही.
महाराष्ट्र काही दिवसातच सिंगल युज प्लास्टीक मुक्त होईल, असेही घोषित करण्यात आले होते. मात्र, दुकानदार, हॉकर्स, फुटपाथवरील विक्रेते सर्रास या प्लास्टीकचा वापर करताना दिसून येत आहे.
प्लास्टीकबंदीची जबाबदारी जितकी दुकानदारांची आहे तितकीच ग्राहकांची देखील आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे हे समजून घरातून बाहेर पडताना कागदी किंवा कापडी पिशवी सोबत घ्यायला विसरू नका.
अनेकजण घराबाहेर पडताना जवळ कागदी पिशवी बाळगत नाहीत. तसेच मार्केटमध्ये जाताना किंवा भाजीपाला खरेदीसाठी सोबत पिशवी न बाळगल्याने हॉकर्स देखील या सिंगल युज पिशव्या ग्राहकांना देतात.
प्रत्येकाने प्लास्टीक प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेतला, तर लवकरच महाराष्ट्र प्लास्टीक बंदी करण्याचं उद्दीष्ट गाठू शकेल.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here