जळगाव ः शहरासह जिल्ह्यात तब्बल तीन दिवसांपासून कोरोना लसी उपलब्ध नव्हत्या. यामुळे अनेकांना लसीकरण केंद्रावर येवून परतावे लागले होते. आज लसी उपलब्ध झाल्याने शहरातील सर्वच केंद्रावर पहाटे पाच पासून रांगा लागल्या होत्या. लसीकरणाचे कुपन आपल्याला मिळावे यासाठी कुपन घेण्यासाठी गोंधळ उडाली. अनेक ठिकाणी नागरिकांमध्येच हमरीतूमरी झाल्याच्या घटना घडल्या. ( jalgaon district corona vaccination center crowd)
Also Read: १८ टक्के शेतकऱ्यांच्या भरडधान्याची झाली खरेदी
कोरोना विरूध्द आताच एकच अस्त्र आहे ते म्हणजे लस घेणे याची जाणीव नागरिकांना झाल्याने लस टोचून घेण्यावर नागरिकांचा भर आहे. यामुळे लस आली ती घेण्यासाठी नागरिकांची झूंबड उडते. शहरासह जिल्ह्यात तब्बल तिन दिवसांच्या ब्रेकनंतर आज लस आल्याने नागरिकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या. अनेक ठिकाणी गर्दी होवू नयेयासाठी कुपन वाटण्यात आले. ते घेण्यासाठी वादावादीच्या घटना शहरातील सर्वच केंद्रावर घडल्या. काहींनी ऑनलाईन नोंदणी करूनही त्यांना लस न मिळाल्याने नागरिकांनी शिवाजीनगर, नानीबाई रुग्णालय, रेडक्रॉस आदी केंद्रावर गर्दी झाली होती. नागरिकांचा झालेला गोंधळ सावरण्यास पोलिसांना पाचारण करावे लागले होते.

मागणी जास्त पुरवठा कमी
धानोरा (ता. चोपडा) येथे लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होत असताना लस तेवढ्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची अक्षरश: लस पुरवताना दमछाक होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत असून कर्मचाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, ऑनलाईन रजिस्ट्रेशनची माहिती ज्येष्ठ नागरिकांना भरता येत नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक केंद्रामध्ये गर्दी करत आहेत. या प्रकारामुळे लसीकरणापेक्षाही नागरिकांचा रोष आणि रजिस्ट्रेशनचा गोंधळ यामध्ये कर्मचाऱ्यांचे अक्षरश: हाल होत आहेत.
Also Read: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोदीच्या प्रतिमेवर शाई फेकली!
युवक-युवतींचा प्रतिसाद
यावल तालुक्यात १८ वर्षावरील कोविड लसीकरणास उपकेंद्र स्तरावर दहिगाव व सातोद येथे प्रारंभ करण्यात आला. शिबिरास १८ वर्षावरील युवक-युवतींचा व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
Esakal