• आता तुमची कारच सांगेल तुम्ही किती दारू प्यायला आहात

  • सॉफ्टवेअर डेव्हलप करणाऱ्या विद्यार्थ्याचा दावा, दारू प्यायला असाल तर कार सुरूच होणार नाही,

  • बीटेक विद्यार्थ्याचे भन्नाट अ‍ॅप,या सॉफ्टवेअरच्या मदतीने टळतील रोड अ‍ॅक्सिडंट

देशात दरवर्षी रोड अपघातात लाखो जीव जातात, अनेक घरे उद्ध्वस्त होतात. हाच विचार मनात ठेऊन चंदिगढच्या एका विद्यार्थ्याने एक अ‍ॅप्लिकेशन बनवले आहे. जर तुम्ही सीट बेल्ट लावला नसेल किंवा दारू प्यायली असेल, तर गाडी स्टार्टच होणार नाही. या अ‍ॅपमध्ये असे अनेक फीचर्स आहेत, ज्यामुळे रस्ते अपघात थांबवता येतील. दारू पिऊन तुम्ही कारमध्ये बसलात आणि अल्कोहोलची मात्रा 0.08 टक्के पेक्षा जास्त असेल तर कारचे इंजिन स्टार्ट होणार नाही. स्टेअरिंगवर लागलेल्या सेन्सरवरून समजेल की ड्रायव्हरने दारू प्यायली आहे किंवा नाही.

AI आणि मशीन लर्निंगचा वापर

चंदीगढ यूनिव्हर्सिटीमधील बीटेक सेकंड इअरचा विद्यार्थी मोहितने ‘रोड पल्स’ नावाचे सॉफ्टवेअर तयार केले आहे. या सॉफ्टवेअरमध्ये मोहीतने लेटेस्ट टेक्नोलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजंस आणि मशीन लर्निंगचा वापर केला आहे. 2025 नंतर जगात आर्टिफिशियल इंटेलिजंस आणि मशीन लर्निंगवरच सर्व कामे होतील असा दावा मोहितने केला आहे.

कारला कशी समजणार अल्कोहलची मात्रा ?

तुम्ही ड्रायव्हींग सीटवर बसून श्वास घ्यायला सुरूवात केली, कार्बन डायऑक्साइडचे पार्टीकल्स ऑटो मीटरवरील इंट्राडे डे सेंसर डीटेक्ट करेल. त्यानंतर लगेच समजेल की ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या व्यक्तीने सरकारी लिमिटपेक्षा जास्त दारू घेतली आहे किंवा नाही.

लोकं अनेकदा यू टर्न घेताना किंवा कार डावी, उजवीकडे नेताना इंडिकेटरचा वापर करत नाहीत, ज्यामुळे अपघात होतात. त्यासाठीच मोहितने खास फीचर अ‍ॅन्ड केले आहे, ज्यात कार स्वतःच 50 मीटर डिस्टेंस आधीपासून इंडिकेटर द्यायला सुरु करेल, गूगल मॅपला मशीन लर्निंगसोबत जोडल्याने असे होऊ शकते.

धुक्यात सुद्धा अपघात रोखणार

धुक्यामध्ये दृश्यमानता अत्यंत कमी असते, हे अपघात होण्याचे आणखी एक कारण आहे. पण मोहितच्या सॉफ्टवेअरमुळे धुक्यातही मागे पुढे असणाऱ्या गाड्यांबद्दल समजते आणि होणारे अपघात टळतात. 20 वर्षीय मोहितने याआधीही अनेक उपयोगी सॉफ्टवेअर बनवले आहेत. त्याच्या टीमने गूगल स्टार्टअप विकेंडमध्ये यूनायटेड बॉय प्लेआर्स नावाने 54 तासांत अ‍ॅप तयार करून दूसरा नंबर पटकावला होता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here