बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी १५ वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आमिरने किरण आधी रीना दत्तसोबत लग्न केले. रिनासोबत आमिरने 16 वर्ष संसार केला. रिना आणि आमिरने 2002 रोजी लग्न केले. दोघांना मुलगी इरा आणि मुलगा जुनैद ही दोन मुलं आहेत. जाणून घेऊयात रिना आणि आमिरच्या नात्याबद्दल काही खास गोष्टी …(bollywood actor aamir khan reena dutta love story)
आमिर आणि रिनाची लव्ह स्टोरी
आमिर आणि रिनाची लव्ह स्टोरी ही अगदी फिल्मी स्टाईलने सुरू झाली. आमिर आणि रिना हे दोघे शेजारी राहात होते. दोघे कित्येक तास त्यांच्या घराच्या खिडकीमधून बोलत असत. आमिरने एका दिवशी धाडस करून रिनाबद्दल त्याचे प्रेम तिच्या समोर व्यक्त केले होते. पण रिनाने त्याला नकार दिला. आमिरने अनेक वेळा तिला प्रपोज केले पण रिना त्याला नेहमी नकारात्मक उत्तर देत असत. आमिरने जेव्हा रिनाबद्दलची सर्व आशा सोडली होता. तेव्हा रिनाने आमिरला होकार दिला होता. 1999 मध्ये झालेल्या मुलाखतीमध्ये आमिरने सांगितले,’त्यावेळी मी माझ्या घराच्या खिडकीमध्ये नेहमी पेक्षा जास्त वेळ थांबत होतो. मी अनेक वेळी रिनाला तिच्याबद्दलच्या माझ्या भावना सांगायचा प्रयत्न केला पण ती उत्तर देत नव्हती, मी लवकर हार पत्करणारा मुलगा नव्हतो. दोन दिवसानंतर ती मला भेटली आणि तिने पुन्हा मला सांगितले की तिला माझ्याबद्दल कोणत्याच भावना नव्हत्या. त्यानंतर मी खिडकी जवळ बसणे टाळात होतो. माझ मन दुखावले होते. मी तिला विसरण्याचा प्रयत्न करत होतो.’
रिनाला रक्ताने लिहिलं होतं प्रेमपत्र
आमिर खानने रिनाला चक्क रक्ताने प्रेमपत्र लिहिलं होतं. रिनासोबत रिलेशनशिपमध्ये असताना आमिरने प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि रिनाला इम्प्रेस करण्यासाठी रक्ताने प्रेमपत्र लिहिलं होतं. मात्र रिनाला ही गोष्ट अजिबात आवडली नव्हती. पुन्हा असं कधीच करू नकोस, अशी सक्त ताकिद रिनाने आमिरला दिली होती.
‘लगान’च्या निर्मितीसाठी रिनाने केली होती मदत
रिनाने आमिरच्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आमिरच्याच ‘लगान’ या चित्रपटाद्वारे तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. निर्मितीसाठी आमिरने रिनाची मदत मागितली होती. तेव्हा रिनाने लगेच होकार कळवला. ‘त्यावेळी चित्रपटांविषयी, निर्मितीविषयी तिला काहीच माहित नव्हतं. तरीसुद्धा ती माझ्यासाठी निर्मिती करायला तयार होती,’ असं आमिर म्हणाला.

Also Read: ‘आमिरसोबत राहणं कठीण’; खुद्द किरणने केला होता खुलासा
घटस्फोटानंतरही आमिर-रिनाचं चांगलं नातं
२००२ मध्ये घटस्फोट घेतल्यानंतरही आमिर आणि रिना यांनी आपली मैत्री कायम ठेवली. आमिरच्या ‘पानी फाऊंडेशन’साठी रिना काम करत असून ती या फाऊंडेशनची मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. ‘रिना ही व्यक्ती म्हणून खूप चांगली आहे. कधीकधी नाती टिकत नाहीत पण तिच्यासाठी माझ्या मनात खूप आदर आणि प्रेम आहे’, असं आमिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
‘कॉफी विथ करण’च्या सहाव्या सिझनमध्ये आमिरने हजेरी लावली होती. या चॅट शोमध्ये आमिर रिनाबद्दल म्हणाला, ‘आम्ही १६ वर्षे एकत्र संसार केला. विभक्त होताना आमच्यासाठी आणि कुटुंबीयांसाठी खूप त्रासदायक परिस्थिती होती. त्या परिस्थितीला आम्ही सामोरं गेलो पण त्यादरम्यान एकमेकांविषयीचं आदर अजिबात कमी झालं नाही. ‘
Also Read: तेव्हा फातिमा सना शेख बरोबर जोडलं होतं आमिरचं नाव
Esakal