जळगाव ः नारपार गिरणा प्रकल्प (Narpar Girna project) आंतरराज्य ऐवजी राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून तत्वतः मान्यता देण्यात आल्याची माहिती भडगाव पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती ॲड.विश्वासराव भोसले यांनी दिली. नारपार खोऱ्यातील पाणी गुजरात (Gujarat) राज्याला न देता गिरणा खोऱ्याला प्राधान्य द्यावे, गुजरात राज्याला पाणी (Water) देण्याबाबतचा करार रद्द (contract cancel) करण्यात यावा, अशी मागणी श्री.पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे फेब्रूवारी २०२० मध्ये केली होती. (narpar project splay by water girna project)

Also Read: १८ टक्के शेतकऱ्यांच्या भरडधान्याची झाली खरेदी

त्या पत्राच्या आधारे दमणगंगा पिंजाळ व पार तापी नर्मदा या आंतरराज्यतीय योजना महाराष्ट्र व गुजरात राज्यात प्रस्तावीत आहेत. दमणगंगा-पिंजाड नदीजोड योजने अंतर्गत ८९५ दशलक्ष घनमीटर पाणी मुंबईल शहराला पिण्याच्या पाण्यासाठी देणे प्रस्तावित आहे. पार, तापी, नर्मदा नदीजोड योजने अंतर्गत गुजरात राज्यातील सौराष्ट्र व कच्छ भागात सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी एकूण १३३० दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होणार आहे. या योजनांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आले आहेत. दमणगंगा व पिंजाळ व पार तापी नर्मदा या गुजरात व महाराष्ट्रातील आंतरराज्य नदीजोड योजनांच्या संदर्भात ३ मे २०१० रोजी झालेल्या सामंजस्य करारातील तरतूदीनूसार महाराष्ट्राने केलेल्या अभ्यासानूसार नारपार गिरणा ३०४.६० दशलक्ष घनमीटर, पार, गोदावरी १७.०० दशलक्ष घनमीटर, दमणगंगा वैतरणा गोदावरी २०२ दशलक्ष घनमीटर, ७.१३ दशलक्ष घनमीटर दमणगंगा एकदरे गोदावरी १४३ (दलघमी) या चार राज्यस्तरीय नदीजोड योजना उपरोक्त नदीजोड योजने अंतर्गत राष्ट्रीय प्रकल्पाचा भाग म्हणून प्रस्तावित केला आहे.

प्रकल्प अहवाल प्रगतीपथावर
योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची कारवाई प्रगतीपथावर आहे. वरील आंतरराज्य व राज्यस्तरीय नदीजोडे योजनांबाबत प्रकल्पाची व्याप्ती प्रकल्पाची किमत याची विभागणी तसेच पाण्याच नियोजन व व्यवस्थापन याबाबत दोन्ही राज्याची संमती झाल्यावर पुढील अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र, गुजरात ही राज्य केंद्र शासनासोबत सामंजस्य करार करणे आवश्यक होते.

Narpar

प्रकल्प होणार राज्याच्या निधीतून

या बाबींसाठी होणारा कालाचा अपव्यय व महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये पाणी वाटपाच्या गुंतागूंतीमुळे होत असलेला संभ्रम विचारात घेता शासनाने १९ सप्टेंबर २०१९ ला आंतरराज्य दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प व राज्य अंतर्गत नारपार गिरणा गोदावरी दमणगंगा वैतरणा धरण गोदावरी व गंगा गोदावरी नदीजोड प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून न घेता राज्या अंतर्गत प्रकल्प म्हणून राज्याच्या निधीतून त्वरीत हाती घेण्यास मान्यता दिली आहे. याबाबत २२ जून २०२१ ला जलसंपदा विभागाने पत्र ॲड.भोसले यांना दिले आहे. या निर्णयामुळे मुंबई शहरासाठी ३१.६० (अघफु), गोदावरी खोऱ्यासाठी २५.५५ (अघफु), तापी खोऱ्याासठी १०.७६ (अघफु) पाणी कोकणातून उपलब्ध होणार आहे.

Also Read: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोदीच्या प्रतिमेवर शाई फेकली!

नारपार’ खोऱ्यातील पाणी गिरणा धरणात येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. गिरणा धरणावर अवलंबून असलेल्या जळगाव जिल्हयातील ५ व नाशिक, धुळेमधील १२ असे एकूण १७ तालुक्यांचा याचा फायदा होईल. आता लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून नारपारचे पाणी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
– ॲड.विश्वासराव भोसले

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here