Euro 2020 England vs Ukraine : यंदाच्या युरो कप स्पर्धेतील प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या इंग्लंडने क्वार्टर फायनलमध्ये मोठा धमाका करत युक्रेनला बाहेरचा रस्ता दाखवला. या सामन्यातील विजयासह इंग्लंडच्या संघाने थाटात सेमीफायनल गाठलीये. 1996 नंतर पहिल्यांदाच इंग्लंडचा संघ सेमीफायनलमध्ये पोहचलाय. आतापर्यंतच्या स्पर्धेत एकही गोल न स्विकारण्याचा आपला रेकॉर्ड अबाधित राखत त्यांनी युक्रेनला 4-0 असे पराभूत केले. मोठ्या स्पर्धेतील नॉक आउट स्टेजमध्ये 4 गोल डागण्यासाठी इंग्लंडला खूप प्रतिक्षा करावी लागलीये. 1966 च्या फिफा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडने 4-2 असा विजय नोंदवला होता. (Euro 2020 Harry Kane twice Harry Maguire Jordan Henderson Goal England Win 4-0 against Ukraine Met Denmark Semifinal)

सामन्याच्या सुरुवातीच्या चौथ्या मिनिटाला कर्णधार हॅरी केनने संघाचे खाते उघडले. पहिल्या हाफमध्ये इंग्लंडने 1-0 ही आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या हाफमधील 46 व्या मिनिटाला युक्रेनवर आणखी एक गोल डागण्यात इंग्लंडला यश आले. हॅरी मागुइरे याने आघाडी 2-0 अशी भक्कम केली. 50 व्या मिनिटाला कर्णधार हॅरी केनने आणखी एक गोल डागून सामन्यावरची पकड 3-0 अशी भक्कम केली. त्याचा हेडर रोखण्याचा साधा प्रयत्नही प्रतिस्पर्धी युक्रेनच्या डिफेंडरनी दाखवला नाही.

Also Read: EURO 2020 : जिगरबाज डेन्मार्कची सेमीफायनलमध्ये धडक

डिक्लेन रेसच्या जागी बदली खेळाडू म्हणून आलेल्या जार्डन हँडरसन याने संघाच्या खात्यात आणखी एका गोलची भर घातली. क्वार्टर फायनलसारख्या मोठ्या स्पर्धेत जार्डनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय गोल ठरला. मोठ्या आघाडीनंतर इंग्लंड ज्या पद्धतीने आक्रमक खेळ करत होते त्यावरुन कर्णधार हॅरी केन या मॅचमध्ये हॅटट्रिक नोंदवणार असे वाटत होते. पण 72 व्या मिनिटाला त्याची शिफ्ट संपल्याचा इशारा झाला. डोमेनिक क्लेवर्ट त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.

Also Read: वर्ल्ड रेकॉर्डसह महिला क्रिकेटमध्ये मितालीचं ‘राज्य’

हॅरी केनने मोक्याच्या क्षणी गोल करण्यास सुरुवात

नॉक आउट राउंडमधील जर्मनी विरुद्धच्या सामन्यात हॅरी केनने युरो कप स्पर्धेतील पहिला गोल डागला होता. हा सामना इंग्लंडने 2-0 असा जिंकला. युक्रेन विरुद्धच्या दोन गोलसह हॅरी केनच्या नावे आता 3 गोलची नोंद झाली आहे. डेन्मार्क विरुद्ध हॅरी केन आपले खात्यात आणखी किती गोल डागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सध्याच्या घडीला स्पर्धेतील सर्वाधिक गोल हे पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि चेक प्रजासत्ताकचा पॅट्रिक शिक यांच्या नावे आहेत. या दोघांनी प्रत्येकी 5-5 गोल डागले आहेत. यांना ओव्हरटेक करत गोल्डन बूटवर कब्जा करण्याची हॅरी केनकडे संधी आहे.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here