रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयात अर्भक अदलाबदल प्रकरणी संबंधित परिचारिकेला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. परिचारिकेच्या हलगर्जीपणामुळे पालकांची द्विधा मनस्थिती झाली. या परिचारिकेवर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, यासाठी चौकशी समितीकडून अहवाल आल्यावर ही कारवाई होईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिली.
जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या शनिवारी ही घटना घडली होती. या प्रकरणाने संपूर्ण जिल्हा सुन्न झाला. ही घटना चुकून घडली असल्याचे सांगितले. तरीही यातून संबंधित दोन्ही कुटुंबीयांची मनस्थिती बिघडली आहे. नेमके काय घडले, हे कळण्याच्या पलीकडे असल्याने आपण कसा विश्वास ठेवायचा. कोणते मूल आपले आहे आणि कोणते दुसऱ्याचे, असा पालकांसमोर प्रश्न आहे. अर्भक अदलाबदल झाल्यामध्ये संबंधित परिचारिकेचा हलगर्जीपणा दिसून येतो.
हेही वाचा– शेतकऱ्यांच्या जीवाला त्या प्राण्यांपासून धोका…
परिचारिकेच्या उडला गोंधऴ
सिझर झाल्यानंतर मुलगी झाली असताना मुलगा झाल्याचे संबंधित परिचारिकेने पालकांना सांगितले. पुन्हा मुलगा नाही, मुलगी झाली. आपल्याकडून चूक झाल्याचे पालकांना सांगितले. या बेजबाबदारपणामुळे रुग्णालयात मोठा गोंधळ निर्माण झाला. या प्रकरणी तक्रार दाखल होऊन एक चौकशी समिती नेमण्यात आली. कोणते मुल कोणाचे, हे निश्चित करण्यासाठी दोन्ही अर्भकांची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय झाला.
हेही वाचा- दैव बलवत्तर होते म्हणूनच वाचले त्या ४६ जणांचे प्राण..
अहवालानंतर पुढील कारवाई : डॉ. बोल्डे
डीएनए अहवालानंतरच पालकांना वस्तुस्थिती कळणार आहे. ही मोठी चूक करणाऱ्या सगळ्या गोष्टीला जबाबदार असणाऱ्या परिचारिकेला तूर्तास जिल्हा रुग्णालयाने सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. चौकशी समितीच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. हा अहवाल राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडेही पाठविण्यात येईल, अशी माहिती डॉ. बोल्डे यांनी दिली.

News Story Feeds