अनिश्चित पाऊस, सिंचनाचा अभाव आणि परिणामी अडचणीत सापडलेला शेतकरी यामुळं मराठवाड्यातला शेतकरी आणि संकट असं समीकरण तयार झालंय.

अनिश्चित पाऊस, सिंचनाचा अभाव आणि परिणामी अडचणीत सापडलेला शेतकरी यामुळं मराठवाड्यातला शेतकरी आणि संकट असं समीकरण तयार झालंय. पेरणी केली तर पाऊस पडत नाही, पाऊस पडला आणि पीक आलच तर गारपीटीनं झोडपलं जात, योगा-योगानं पीक आलच तर भाव मिळत नाही. या सगळ्यात शेतकरी पुर्ता भरडला जात असल्याचं चित्र गेल्या कित्येक दिवसांपासून पाहायला मिळतंय. मात्र अशा परिस्थितीत सुद्धा शेतकरी तग धरुन राहण्याचा प्रयत्न करताना दिसतो. (Dragon fruit cultivation flourishes in drought prone areas article by sudhir kakde)

मराठवाड्यातील जालना जिल्ह्याला नेहमीच दुष्काळाच्या झळा बसतात. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी राज्य सरकारच्या आणि केंद्रीय पथकांचे पाहणी दौरे सुरू असता. मात्र याच जालना जिल्ह्यात आता शेतकरी परदेशी फळ पिकवण्याचे प्रयत्न करत असल्याचं पहायला मिळतंय.

dragon fruit

जालन्यातल्या बदनापुर तालुक्यामध्ये असणाऱ्या घाटी शिरसगाव येथील तरुण शेतकरी अजय शेजुळ यांनी आधुनिक शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि जुलै 2020 मध्ये आपल्या शेतातील 20 गुंठे क्षेत्रात ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राथमिक माहिती मिळवली. सांगलीतल्या एका नर्सरी मधून त्यांनी ही रोपं मागवली आणि तर्कशुद्ध पद्धतीनं लागवड केली. त्यासाठी शेतात 12 बाय 8 अंतरावर खड्डे खोदून सीमेटी पोल रोवले. त्या पोलच्या भोवती मातीचे बेड तयार करून, एका पोल भोवती 4 रोप या पद्धतीनं लागवड केली. आता त्यांच्या या ड्रॅगन फ्रुटच्या रोपांना कळ्या लागल्या असून येत्या काही दिवसात त्या फळ लागणार आहे. आता पर्यंत हे पीक नवं असलं तरी आम्हाला अजून तरी कोही अडचण आली नसल्याचं त्यांनी सांगितलं.

dragon fruit

Also Read: गुंतवणूकदार काय पाहतो?

याबद्दल बोलताना अजय सांगतात की, “दुष्काळी परिस्थिती, निसर्गाचा असमतोल यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नैराश्यता आली. त्यामुळे आता आपल्याला आधुनिक शेतीचे प्रयोग करून पाहावेच लागणार या हेतूनं आम्ही ड्रॅगन फ्रुटची लागवड केली.’ लागवड झाली, फळ आलं मात्र तरीही त्याला बाजरात मिळणाऱ्या भावावरूनच फायदा किंवा तोटा ठरू शकतो. ड्रॅगन फ्रुटचा बाजारभाव आणि विक्री करताना काही अडचणी येतात का हे जाणून घेण्यासाठी आम्ही जाफराबाद तालुक्यात राहणाऱ्या विष्णू रामदास बारगळ यांच्याशी संपर्क साधला.

विष्णू आणि त्यांच्या वडिलांनी शेतीमध्ये नवा प्रयोग करण्याच्या विचारात 2016 मध्ये ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. त्यानंतर आता पर्यंत त्यांना पिकातून मिळालेल्या नफ्याबद्दल जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. रामदास बारगळ आणि त्यांचा मुलगा विष्णू यांनी सांगितलं की, “सुरुवातीला ड्रॅगन फ्रुटची लागवड केली तेव्हा हे सक्सेस होईन का नाई भरोसा नव्हता. पण फळ आलं. पहिला फ्लॅश सोडून आम्ही दुसऱ्या वेळेस आलेलं फळ काढलं. ऑरगॅनिक खत वापरलं, जेणे करून फळाचं चांगलं पोषण झालं पाहिजे.”

dragon fruit

Also Read: तिसरी लाट केव्हा येईल? भयानक असेल का? तज्ज्ञांनी केला उलगडा

फळ आल्यानंतर पहिल्यांदा बाजरात घेऊन जाताना किंवा विक्री करताना बऱ्याच अडचणी आल्याचं देखील बारगळ यांनी यावेळी सांगितलं. “आपल्याकडच्या लोकांना हे फळ जास्त माहिती नाही, फळ महाग आहे, म्हणून सुरुवातीला कोणी घेतंच नव्हतं. मग आम्ही औरंगाबादला आणि पुण्याला घेऊन गेलो, तर तिथं चांगला भाव भेटला. आता पर्यंत विकलेल्या मालात एक फळ कमीत कमी 55 रुपये तर जास्तीत जास्त 160 रुपयांना आम्ही विकल, आता पर्यंत तरी आम्हाला कोणतीच अडचण आली नसुन चांगला फायदा झाला”

dragon fruit

मराठवाड्यातल्या पावसाचं प्रमाण, सिंचन किंवा कालव्यांचा अभाव यामुळं कमीत पाण्यात येणारी अशी पीक उपयुक्त ठरणार आहेत. तरीदेखील जोपर्यंत या विदेशी पिकांसाठीचं मार्केट तयार होणं देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे.

( सुधिर काकडे

sudhirkakde45@gmail.com)

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here