सध्या ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या शोमधील कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad), इतर स्पर्धक रोहित राऊत (Rohit Raut), मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan), प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) आणि आर्या आंबेकर या परिक्षकांना शोमधील त्यांच्या ओव्हर अ‍ॅक्टिंगमुळे सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. परिक्षकांना ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला आता ‘शो’ची सूत्रसंचालिका मृण्मयी देशपांडेने (mrunmayee deshpande) सडेतोड उत्तर दिले आहे.(sa re ga ma pa little champs trolled for their over acting actress mrunmayee deshpande give answer)

मृण्मयी सोशल मीडियावर नेहमी तिच्या चाहत्यांसोबत संवाद साधते. नुकताच मृण्मयीला एका ट्रोलरने ‘सारेगमप’च्या परिक्षकांना ट्रोल करत कमेंट केली, ‘समोर असलेले जज आणि अँकर खूपच आरडा ओरडा करतात.’ यावर मृण्मयीने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले. मृण्मयीने कमेंट केली, ‘तुम्ही या मुलांचं गाणं ऐकून काय केलं असतं? हाताची घडी घालून शांत बसला असतात का?’. मृण्मयीने या ट्रोलरला दिलेल्या या सडेतोड उत्तराचे अनेकजण समर्थन करत आहेत.

mrunmayee deshpande answer

Also Read: ‘तुमच्या दुटप्पीपणाचं दुःख वाटतं’; ट्रोलर्सला प्रियाने दिलं उत्तर

कार्तिकी गायकवाडची तुलना हिंदी गायिका नेहा क्ककरसोबत केली जात आहे. शोमध्ये कार्तिकी सतत रडते किंवा भावनिक होते. हिंदी शो इंडियन आयडॉलमध्ये देखील नेहाला अशाच कारणामुळे ट्रोल केले जाते होते. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर नेहा आणि कार्तिकीचे मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत. या शोमधील मेंटॉर प्रथमेश लघाटेला ‘महेश काळे यांची कॉपी करत आहे’ असे म्हणत अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. तसेच आर्या आंबेकर आणि रोहित राऊतच्या परिक्षणावरील अनेक मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Also Read: ‘आम्ही अजूनही दोन वेगळे कुटुंबच’; सावत्र बहिणींबाबत अर्जुनचा खुलासाEsakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here