

समुद्राच्या पाण्यात भिजण्यापूर्वी अनेकांना बीचवर कोवळ्या उन्हात बसायला आवडतं. अशा व्यक्तींनी राऊंड शेपचा टॉवेल घ्यावा. सध्या बाजारात वेगवेगळ्या रंगांचे आणि डिझाइनचे टॉवेल्स उपलब्ध आहेत. या टॉवेलमुळे तुम्ही नक्कीच कूल लूकमध्ये दिसाल.

लहान मुलांसाठीदेखील अनेक ट्रेंडी टॉवेल्स सध्या उपलब्ध आहेत. मुलांची आवडनिवड लक्षात घेऊन हे टॉवेल तयार केले जातात. त्यामुळे त्या टॉवेल्सवर कार्टुनची असंख्य चित्र पाहायला मिळतात.

सध्या बाजारात अनेक प्रिंटेड टॉवेल असल्याचं पाहायला मिळतं. या टॉवेल्सवर काही खास मजकूर लिहिण्यात आलेले असतात. त्यामुळे हे टॉवेल्स वापरल्यावर तुमचा कूल लूक नक्कीच उठून दिसेल. मात्र, असे टॉवेल खरेदी करण्यापूर्वी त्यावर लिहिलेल्या मजकुराचा अर्थ नक्कीच समजून घ्या.

मल्टीकलर टॉवेलची सध्या तरुणांमध्ये विशेष क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे जर तुम्ही मित्र-मैत्रिणींसोबत जात असाल तर हा मल्टीकलर टॉवेलसोबत घेऊन जायला काहीच हरकत नाही.

लार्ज टॉवेल म्हणजे मोठा टॉवेल. जर तुम्हाला समुद्र किनाऱ्यावर बसून सनबाथ घ्यायचा असेल तर लार्ज टॉवेल असणं अत्यंत गरजेचं आहे. यावर तुम्ही झोपून मस्त कोवळं ऊन अनुभवू शकता.
Esakal