नागपूर : फिरायला आपल्यापैकी अनेकांना आवडते. परदेशात फिरायला (travel abroad) जाण्याची आपल्यापैकी अनेकांनी मनोमनी असलेली इच्छा असते. लोक परदेशात जाण्यासाठी कित्येक महिने तयारी करीत असतात. मात्र, परदेशात प्रवास करण्यासाठी नशीब लागते. अनेकदा पासपोर्ट काढलेला असतो पण व्हिसा (Visa) काढण्यासाठी येणारा खर्च, ताण, व्हिसा मिळवण्याची किचकट प्रक्रिया यामुळे परदेशवारीकडे दुर्लक्ष होते. मात्र, असे काही देशा आहेत जिथे तुम्ही व्हिसा शिवाय फिरायला जाऊ शकता. (Why-travel-to-these-countries-without-a-visa-The-dream-of-traveling-abroad-will-be-fulfilled)

इंडोनेशिया अद्वितीय संस्कृती आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे भारतीय ३० दिवस व्हिसाशिवाय राहू शकतात.
बार्बाडोस हा एक सुंदर देश आहे. जो प्रशांत महासागराच्या पश्चिमेस असलेल्या कॅरिबियन बेटावर आहे.
भूटान हा भारताच्या बाजूलाच असलेला हा देश पर्यटनासाठी सर्वोत्तम देश आहे. तरीही इथली सुंदर स्थळ भल्या भल्या श्रीमंत देशांना लाजवतील अशीच आहेत. हा देश फार सुखी आणि शांत आहे.
हिमालयाच्या कुशीत वसलेला नेपाळ हा देश भारताला लागूनच आहे. इथे फिरायला भारतीयांना व्हिसाची गरज नाही.
त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये फिरायला जाण्यासाठी भारतीयांना व्हिसाची आवश्यकता नाही. येथे ९० दिवस व्हिसाशिवाय राहता येऊ शकते.
हिंद महासागराजवळ असलेला मालदीव हा देश छोट्या छोट्या बेटांनी सजलेला आहे. व्हिसाशिवाय इथे तीस दिवस राहता येते. या देशाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वस्तात तुम्हाला लग्झरी आयुष्य जगता येऊ शकते.
श्रीलंकेत पोहोचल्यानंतर भारतीयांना लगेच व्हिसा मिळतो. भारतापासून हा देश फक्त तीन तासांच्या अंतरावर आहे.
मकाऊ या देशात जाण्यासाठी भारतीयांना व्हिसाची गरज नाही. हाँग काँगमार्गे मकाऊला जाणे जास्त योग्य. कॅसिनोची आवड असणाऱ्यांसाठी हा सर्वोत्तम देश आहे.
फिजीला भेट देण्यासाठी भारतीय पर्यटकांना व्हिसा लागत नाही. या सुंदर देशात चार महिने फिरू शकतो.
दक्षिण आशियातील सर्वांत सुंदर देशांपैकी एक देश म्हणजे कंबोडिया. कमी पैशांत सर्वोत्तम जीवन संस्कृती पाहायची असेल तर एकदा तरी या देशाला भेट द्या.
मॉरिशससुद्धा भारतीयांना व्हिसाशिवाय प्रवेश देतो. येथे ९० दिवस राहता येते. निळ्या पाण्याच्या समुद्रात प्रवासासाठी हा देश प्रसिद्ध आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here