बॉलिवूड, हॉलिवूड आणि क्रिडा क्षेत्रातील सेलिब्रिटी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ ते नेहमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करतात. अनेक ब्रॅण्डसाठी सेलिब्रिटी प्रमोशनल पोस्ट शेअर करत असतात. त्या पोस्टमधून ते पैसे कमवतात. पाहूयात अशाच काही टॉप सेलिब्रिटींची यादी…

हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच हॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण करणारी प्रसिध्द अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती सोशल मीडियावर विविध ब्रॅण्डस् प्रमोट करते. प्रियांका इन्स्टा पोस्टसाठी ३ कोटी रुपये मानधन घेते.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या एका इन्स्टा पोस्टसाठी ५ कोटी रूपयांहून अधिक मानधन घेतो.
पोर्तुगालचा कर्णधार आणि स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याचे चाहते त्याला सोशल मीडियावर फॉलो करतात. रोनाल्डो इन्स्टा पोस्टसाठी जवळपास १२ कोटी रुपये घेतो.
हॉलिवूड अभिनेता ‘द रॉक’ चा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टला चाहत्यांची पसंती मिळते. रॉक एका इन्स्टा पोस्टमधून ११ कोटी रुपये कमावतो.
आपल्या गाण्यांने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी गायिका आणि अभिनेत्री सेलीना गोमेज तिच्या इन्स्टावरील एका पोस्टमधून ११ कोटी कमावते.
अमेरिकन सिंगर आणि अभिनेत्री आरियाना ग्रांडे तिच्या एका इन्स्टा पोस्टमधून जवळपास ११ कोटी रुपये कमावते.
अमेरिकन मॉडेल किम कार्दशियन तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमी चर्चेत असते. किम कार्दशियन तिच्या इंस्टाग्रामवरील एका पोस्टमधून 10 कोटी कमावते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here