धुळे : पावसाने (Rain) दिलेल्या हुलकावणीमुळे जिल्ह्यातील खरीप पिके जळू लागली आहेत. जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस नसल्याने केवळ २३ टक्के पेरण्या (Sowing) झाल्या आहेत. उडीद, मूग पिकांचा पेरणीचा हंगाम संपल्यात जमा आहेत. शेतकऱ्यांवर (Farmer) दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. आता ११ जुलैनंतरच पुन्हा पावसाला सुरवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने (Weather department) वर्तवला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. (farmers in dhule district are worried about the rains)

Also Read: ‘त्या’ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

जिल्ह्यात सुरवातीला काही भागातच पावसाने हजेरी लावली. नंतर अनेक ठिकाणांहून पाऊस गायब झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यात वेगाने पेरणी केली, तर काही शेतकरी आणखी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत राहिले. त्यामुळे सरसकट पेरणी झालीच नाही. त्यातच आता पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक भागात कोरडी हवा आणि प्रचंड उकाड्याचा सामना करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. यातून एक तर पेरणी झालेल्या शेतकऱ्यांची कोवळी पिके मान टाकू लागली आहेत, तर दमदार पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

farm

जिल्ह्यात मृग नक्षत्रात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यानंतर सुरू झालेल्या आर्द्रा नक्षत्रातही दमदार पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत फक्त १८.६ टक्के पाऊस झाला आहे. पुरेशा पावसाअभावी पेरण्या रखडल्या आहेत. खरिपात चार लाख १६ हजार ९७८ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट आहे. पैकी आतापर्यंत फक्त २३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. धुळे तालुक्यात एक लाख ७ हजार ८०० हेक्टरपैकी ३६ हजार ४३३ हेक्टरवर म्हणजे ३३.८० टक्के, साक्री तालुक्यात एक लाख १ हजार ८५० हेक्टरपैकी १६ हजार २९१ हेक्टर म्हणजे १६ टक्के, शिरपूर तालुक्यात एक लाख ६ हजार ५९६ पैकी १६ हजार ८९ हेक्टरवर म्हणजे १५. ९ टक्के, शिंदखेडा तालुक्यात एक लाख ७३२ हेक्टरपैकी २४ हजार ५७३ हेक्टर म्हणजे २४. ३९ टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९३ हजार ३४६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

Also Read: बीएचआर घोटाळा; कंडारेला पळवणारे अन्‌ मदतगार रडारवर

तालुकानिहाय पाऊस
धुळे : १३३.३ मिमी, साक्री : ११२.३ मिमी, शिरपूर : ४८.४ मिमी, शिंदखेडा : ८१.८ मिमी. पावसाची स्थिती : ५३५.१ पावसाची सरासरी, २२२ मिमी पाऊस गेल्यावर्षी जुलैपर्यंत झाला. ९९.४ मिमी पाऊस यंदा जुलैपर्यंत झाला. १८.६ टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here