तुम्ही YouTube व्हिडिओच्या मध्यभागी दिसणारी जाहिरात पाहून त्रस्त झाला असेल तर हि माहिती तुम्हाला उपयोगाची आहे. येथे तुम्हाला एका खास ट्रिक्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही YouTube मध्ये येणार्‍या जाहिराती ब्लॉक करण्यास सक्षम असाल.

पुणे : YouTube हे जगातील सर्वात मोठे व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म (Video streaming platform)आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण करतात. पण जेव्हा व्हिडिओ पाहताना जाहिराती मध्यभागी येतात तेव्हा चिडचिड होते. जवळजवळ सर्व यूजर्संना या समस्येचा सामना करावा लागतो. तसेच व्हिडिओच्या मध्यभागी येणारी जाहिरात कशी थांबवायची हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. तर आम्ही तुम्हाला यासाठीच एक ट्रिक्स (Tricks) सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही YouTube मध्ये येणार्‍या जाहिराती ब्लॉक (Block) कराल आणि कोणत्याही अडचणीशिवाय व्हिडिओ पाहाल. (tech guide how to block ads on youtube app android complete and simple process here)

Also Read: महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध टेनिस खेळाडू अर्जुन कढे यांचा प्रेरणादायी प्रवास; पाहा व्हिडिओ

असे ब्लॉक कराल YouTubeव्हिडिओंवरील जाहिराती

– जाहिराती ब्लॉक करण्यासाठी Google Chrome उघडा

– येथे Adblocker Extension Chrome सर्च करा

– स्क्रीनवर एक नवीन विंडो उघडेल, ज्यामध्ये AdBlock—best ad blocker–Google Chromeदिसेल, त्यावर टॅप करा

– आता आणखी एक विंडो उघडेल, ज्यामध्ये Add to Chrome हा ऑप्शन सापडेल, त्यावर क्लिक करा

– क्लिक केल्यानंतर फाइल डाउनलोड होईल

– आता ते ओपन करा

– ते ओपन केल्यानंतर, एक्सटेंशन क्रोम मध्ये जोडला जाईल

– यानंतर आपण विना अडथळा YouTube व्हिडिओ पाहू शकता

Also Read: न्यायालयाने रामदेव बाबांचा मूळ व्हिडिओ मागवला

YouTube Subscriptionपॅक

तुम्ही जाहिराती काढून टाकण्यासाठी YouTube Subscription पॅक देखील वापरू शकता. याद्वारे तुम्ही विना अडथळा YouTube व्हिडिओ पाहु शकता. यासाठी तुम्हाला दरमहा फक्त 129 रुपये भरावे लागेल.

Also Read: Euro 2020 : पोर्तुगाल-फ्रान्स तगडे संघ कसे फसले!;पाहा व्हिडिओ

लवकरच लॉन्च होईल हे फिचर

YouTube आपल्या यूजर्ससाठी चॅप्टर फीचर आणण्याची तयारी करत आहे. हे फीचर आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंग Algorithms तंत्रज्ञानावर आधारित असेल आणि या चॅप्टरमधून व्हिडिओ आपोआप जोडले जातील. सध्या व्हिडिओ अपलोड करताना क्रिएटर्स यांना मॅन्युअली चॅप्टर जोडावे लागतील. या फिचरची टेस्टिंग घेण्यात येत असल्याचे कंपनीने कन्फर्म केलं आहे. याचा सर्वाधिक फायदा क्रिएटर्स यांना होणार आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here