नागपूर : केंद्र सरकारला (central government) मराठा आरक्षणासंदर्भात (maratha reservation) वटहुकूम काढावा लागेल. घटनादुरुस्ती करावी लागेल., याबाबत मी जर चुकत असेल तर सत्ताधारी आणि विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन सांगावं. कोरोनाच्या संकटात लोकांना बाहेर पडायला, रस्त्यावर उतरायला लावू नका, असा इशारा खासदार छत्रपती संभाजी राजे (MP sambhaji raje) यांनी दिला. आज ते नागपुरात बोलत होते. (MP sambhaji raje warn government on maratha reservation)

Also Read: रात्री जेवण केल्यानंतर पत्नीसोबत झाला वाद; रागात केला खून

खासदार छत्रपती संभाजी राजे

मराठा समाज किती दुःखी आणि व्यथित आहे, हे सरकारला दिसायला पाहिजे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक नेत्यांना भेटलो. त्यासाठी कोल्हापूर आणि नाशिकला मुक्त आंदोलन केले. मात्र, सरकारने सकारात्मकता दाखवल्याने मुक आंदोलनाला स्थगिती दिली. त्यानंतर हा संवाद दौरा सुरू केला आहे. नेत्यांना आता आरक्षणाच्या पर्यायावर बोलायला पाहिजे. आता अधिवेशन सुरू झाले. सर्व आमदारांनी, मंत्र्यांनी अधिवेशनामध्ये आरक्षणासंबंधी मुद्दे मांडावे, असे खासदार छत्रपती संभाजी राजे म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी पहिला पर्याय होता पुनर्विचार याचिका. आता पुढचा पर्याय आहे, मागासवर्गीय आयोग स्थापन करून मराठा समाज मागास आहे याबाबत सर्व्हे करावा लागेल. हे सर्व राज्य सरकारच्या हातात आहे. मात्र, हे सरकार का करत नाही? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मराठा-कुणबी समाज एकच आहे. कुणी आमच्यात भांडणं लावू नये. सरकारने निर्णय घेतले नाही, या अधिवेशनात जर ठोस निर्णय घेतले नाही तर आम्ही पुन्हा मूक आंदोलन करू, असेही ते म्हणाले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here