पनीर हे आहारासाठी उत्तम असून त्यात फायबर भरपूर आहे. त्यामुळे पनीर हे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवते. तसेच पनीर हे अन्न पचवीण्यास करण्यास मदत करते. ज्यामुळे मूळव्याधा, कोलेस्ट्रॉल, बद्धकोष्ठता आणि साखर पातळीत (डायबेटीस) वाढ यासारख्या अनेक समस्या दूर आहेत.
पनीरमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण भरपूर असतात, जे हाडांसाठी अतिशय महत्वाचे आहेत. दररोज कच्च्या पनीरचे खाल्यास हाडांच्या दुखण्यात आराम मिळतो आणि हाडे मजबूत होतात.
पनीर मध्ये केवळ प्रथिने नसून लिनोलिक अॅसिड देखील भरपूर प्रमाणात आढळते. त्यामुळे शरीरात चरबी हे जाळण्याच्या प्रक्रिया होते. त्यामुळे वाढलेले वजन कमी होते तसेच शरिरावरील चरबी देखील कमी होते. म्हणून दररोज कच्च्या पनीर खाणे आपल्या आहारात समावेश करा.
पनीर नियमीत सेवन केल्यास धमन्यांमधील अडथळे कमी करतो. त्यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो. याशिवाय शरीराची कोलेस्टेरॉलची पातळीही नियंत्रणात राहते.
पनीरमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी असल्याने शरिरात साखरचे प्रमाण वाढू देत नाही. त्यामुळे मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांनी दररोज कच्चे पनीर खाणे चांगले असते. ओमेगा -3 फॅटी अॅसिड कच्च्या चीजमध्ये आढळतात. दररोज त्याचे सेवन केल्यास साखर नियंत्रणात राहते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here