पावसाळा सुरु झाला की केस आणि त्वचेशी संबंधित अनेक तक्रारी डोकं वर काढतात. यात सगळ्यात मोठी समस्या असते ती म्हणजे केसांच्या चिकटपणाची. पावसाळ्यात अनेकदा केस चिकट होतात किंवा त्यांना खराब वास येतो. त्यामुळे पावसाळ्यात केसांना तेल लावावं की लावू नये हा प्रश्न कायम अनेकांना पडतो. म्हणूनच, पावसाळ्याच्या दिवसात केसांना तेल कधी व कोणतं लावावं ते जाणून घेऊयात.पावसाळ्यात कधीही केस धुण्यापूर्वी डोक्याला कोमट तेलाने मालिश करावी. वातावरणात झालेल्या बदलामुळे अनेकदा केस गळतात किंवा चिकट होतात. त्यामुळे कोमट तेलाने मालिश केली तर या समस्या दूर होण्यास मदत मिळते.कधीही केसांना एरंडेल किंवा मोहरीचं तेल लावावं. त्यामुळे केस मजबूत होतात.जर केस चिकट झाले असतील तर केस स्वच्छ धुवावेत त्यानंतर २-३ तासाने तेल लावावं.केस स्वच्छ धुतल्यानंतरही त्यांच्यातील चिकटपणा किंवा वास जात नसेल तर लिंबाचा रस केसांना लावावा. त्यानंतर केस स्वच्छ धुवावेत.