भारतीय महिला जलतरणपटू माना पटेल (Maana Patel) टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली माना भारताची पहिली महिला स्विमर आहे. माना पटेल हिने उज्बेकिस्तान ओपन स्पर्धेत यंदाच्या हंगामातील पहिल्या आतंरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला होता. एप्रिलमध्ये झालेल्या या स्पर्धेत माना पटेल हिने 1:04.47 सेकंद वेळेत महिला 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात सुवर्ण कमाई केली होती. माना पटेल (Maana Patel) हिने यूनिवर्सिटी कोटा प्राप्त करत टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. 100 मीटर बॅकट्रॉक प्रकारात ती भारताचे प्रतिनिधीत्व करताना दिसेल.मानापूर्वी श्रीहरि नटराज (100 मीटर बॅकस्ट्रोक) आणि साजन प्रकाश (200 मीटर बटरफ्लाय) मध्ये ऑलिम्पिक पात्रता मिळवली होती. पुरुष महिला असा एकंदरीत विचार केला तर माना पटेलही भारताची तिसरी जलतरणपटू आहे जी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे.