बॉलिवूड कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्याबद्दल काही कलाकार बिनधास्तपणे बोलतात. नुकताच अभिनेता आमिर खान आणि किरण रावने घटस्फोट घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्याच्या या निर्णयाचा अनेकांना धक्का बसला. आमिरच्या आधीही असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी दुसऱ्या- तिसऱ्या लग्नानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांनी रुमा गुहा यांच्याशी पहिले लग्न केले.
त्यानंतर किशोर यांनी अभिनेत्री मधुबाला यांच्यासोबत दुसरे लग्न केले. १९६९ मध्ये मधुबाला यांचे निधन झाले.
त्यानंतर किशोर कुमार यांनी योगिता बाली यांच्याशी तिसरे लग्न केले. हे लग्नही फार काळ टिकले नाही. त्यानंतर किशोर कुमार यांनी लीना चंद्रवरकरशी लग्न केले.
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तने रिचा शर्मासोबत पहिले लग्न केले. ब्रेन ट्युमरमुळे तिचे निधन झाले.
त्यानंतर संजयचे दुसरे लग्न रिया पिल्लईसोबत झाले. संजय दत्तने २००८ मध्ये रियाला घटस्फोट दिला
संजूबाबाने २००८ मध्येच तिसरे लग्न मान्यताशी केले.
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता करणसिंग ग्रोव्हरने श्रद्धा निगमशी पहिलं लग्न केले. काही महिन्यातच करण आणि श्रद्धाने घटस्फोट घेतला.
करणने अभिनेत्री जेनिफर विंगेटशी दुसरं लग्न केले. दोन वर्ष एकत्र राहिल्यानंतर जेनिफर आणि करणने घटस्फोट घेतला.
2016 मध्ये करणने बिपाशा बासूसोबत तिसरं लग्न केलं.
बॉलिवूडमधील निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरने विद्या बालनसोबत लग्न केलं. हे त्याचं तिसरं लग्न आहे. सिद्धार्थचं पहिले लग्न आरती बजाजशी झालं होतं. यानंतर त्याचं दुसरं लग्न कविताशी झाले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here