श्रीनगरला भेट देताना डल सरोवराचा आनंद घ्यायला विसरू नका. हे श्रीनगरचे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

आपण चालती-फिरती बाजारपेठ नक्कीच पाहिली असेल. परंतु, तुम्ही कधी पाण्यावर तरंगणारी बाजारपेठ पाहिलीय? नाही ना! मग, चला तर आम्ही तुम्हाला पाण्यावर तरंगणार्‍या भाजी मार्केटमध्ये घेऊन जाऊ.. ही भाजी मंडई काश्मीरमध्ये असून इथे आजूबाजूचे ग्राहक या मंडईत खरेदीसाठी येतात. काश्मीर जगभरात आपल्या सौंदर्यासाठी खूप प्रसिध्द आहे आणि इथला अनोखा नजारा नक्कीच आपल्या डोळ्यांचे पारणे फेडतो.
काश्मीरातील तलावामध्ये असलेलं ‘बाजार’ जगभरातील लोकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलंय. डल तलावाच्या आत तरंगणारी भाजी मंडई खूप प्रसिद्ध असून तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की डल तलावाच्या या भाजी मार्केटमध्ये लोक भाजी खरेदी करण्यासाठी बोटीवरून येतात.
श्रीनगरला भेट देताना डल सरोवराचा आनंद घ्यायला विसरू नका. हे श्रीनगरचे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत डल तलावावर पर्यटक सर्वत्र दिसतात. याचे सौंदर्य प्रत्येकाला मंत्रमुग्ध करते. डल लेकमध्ये आपण हाऊस बोटचा देखील आनंद घेऊ शकता.
येथील बाजार इतका प्रसिद्ध आहे, की काश्मीरला येणारे पर्यटक नक्कीच ते बघायला जातात. येथे सकाळच्या प्रहरी बाजारात भाजीपाला विकला जातो. स्थानिक लोकांबरोबरच अनेक पर्यटकही येथे भाजी खरेदी करताना दिसतील.
जगभरातील पर्यटक निशात बागेत दुर्मिळ जातीची सुंदर फुले पाहण्यासाठी येतात. डल तलावाच्या काठावरच निशात बाग आहे. डल तलावातली ही भाजी मंडई श्रीनगरची घाऊक भाजीपाला बाजारपेठ आहे, जी सकाळी लवकर उघडते आणि सुमारे दोन ते तीन तास चालते.
या तलावातील मंडईमध्ये सर्वात ताजी भाजी मिळते, त्यामुळे तलावामध्ये हाऊसबोटीत राहणाऱ्या लोकांबरोबरच पर्यटकही येथे भाजीपाला घेण्यासाठी येतात. हा बाजार पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलाय.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here