‘माझा होशील ना’ Maza Hoshil Na मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडेने Gautami Deshpande सोशल मीडियावरील पोस्टसंबंधी तिचं मत मांडलं आहे. सोशल मीडियावर एखादा संवेदशनशील व्हिडीओ, फोटो किंवा मजकूर पोस्ट करताना एकदा विचार करण्याचं आवाहन तिने चाहत्यांना केलं आहे. इन्स्टाग्रामवरील स्टोरीमध्ये गौतमीने तिचं हे मत मांडलंय. (Maza Hoshil Na fame Gautami Deshpande urges netizens to be sensitive while sharing posts on social media)
गौतमी देशपांडेची पोस्ट-
‘हल्ली एकूणच सगळ्यांना काय झालंय कळत नाहीये. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याचे फोटोज शेअर करणे, त्यांच्या फॅमिलीचे रडतानाचे फोटो शेअर करणं हे गरजेचा आहे का? एखादा एक्सीडेंट झाल्यानंतर त्याचं सीसीटीव्ही फुटेज शेअर करणं खरंच गरजेचं आहे का? या सगळ्या गोष्टी बघून फक्त त्रास होतो. कोरोनाच्या काळात ज्या लोकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावलंय त्यांना हे असं सगळं बघून त्रास होऊ शकतो हा विचार का केला जात नाही? खरोखरंच आपल्याला आपलं थिंकिंग आता बदलायची गरज आहे. पटतंय ना?’, अशी पोस्ट गौतमीने केली.
Also Read: ‘बिग बॉस मराठी’साठी अभिनेत्रीने सोडली ‘देवमाणूस’ मालिका?

सोशल मीडियावर सक्रिय असलेली गौतमी तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. याच माध्यमाचा उपयोग तिने काही तिचे विचार मांडण्यासाठीही केला आहे. गौतमी सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत तिची आणि अभिनेता विराजस कुलकर्णीची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडत आहे.
Esakal