नंदुरबार ः कोरीट (ता. नंदुरबार) येथे शेतात (Farm) कामासाठी गेलेल्या महिलेचा (Woman) धारदार शस्त्राने गळा चिरून खून (Murder) केल्याची घटना रविवारी (ता. ४) घडली. याबाबत नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात (Nandurbar Taluka Police Station) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. (korit village woman who went to the field was killed)

Also Read: जिद्दीपुढे नियतीही झुकली; आईच्या कष्टाचे मुलाने केले चीज

CRIME

कोरीट येथील उषाबाई कोळी (वय ४५ ) या स्वतःच्या शेतात गेल्या होत्या. त्यांचा गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून करण्यात आला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह मारेकऱ्यांनी शांतीलाल जतन कोळी यांच्‍या उसाचा शेतात फेकून दिला होता. रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तत्काळ पोलिसांना माहिती कळविण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक ए. व्ही. पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पंचनामा करून हिरालाल कोळी यांनी दिलेल्या फर्यादीवरून अज्ञात मारेकरूंविरूध्द खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Also Read: महिनाभरात चोरट्यांनी दहा लाख किमतीचे शेतातील साहित्य केले लंपास

गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी
नंदुरबार तालुक्यातील कोरीट येथील खून प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी कोळी समाज सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. या बाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले. या घटनेतील दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे, यावेळी दादा कोळी, भास्कर कुवर, घारू कोळी, कमलेश कोळी, सागर चित्ते, जयेश चित्ते, अर्जुन शिरसाठ, शुभम चित्ते, नीलेश कोळी, गणेश कोळी, गोपाल कोळी, मयूर कोळी, जिवन कोळी, कुलदीप कोळी, सचिव कोळी, सागर कोळी, रविदास कोळी, श्रीकांत कोळी, विशाल कोळी, दादाभाई कोळी, रूषिकेश सोनवणे, गणेश कोळी, आदी उपस्थित होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here