मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटच्या पंढरीतील आठवणीला उजाळा देणारा एक व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर केलाय. 5 जुलै 2014 रोजी मेरिलिबोन क्रिकेट क्लब (MCC) आणि रेस्ट ऑफ इलेव्हन यांच्यात लॉर्ड्सच्या मैदानात सामना रंगला होता. सचिन वर्सेस वॉर्न अशा लढतीमध्ये अनेक गोष्टी या लक्षवेधी ठरल्या होत्या. ज्या सचिनची आणि लाराची तुलना व्हायची ती दोघही एका संघातून खेळली होती. दुसरीकडे युवराज सिंग हा सचिनच्या विरोधी संघातून खेळताना पाहायला मिळाले होते. तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील मेरिलिबोन क्रिकेट क्लबने हा सामना 7 विकेट्स राखून जिंकला होता. सलामीवीर फिंचने या सामन्यात नाबाद 181 धावांची खेळी केली होती. मुथय्या मुरलीधरनच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी सचिनने या सामन्यात 45 चेंडूत 44 धावांचे योगदान दिले होते.

लॉर्ड्सच्या मैदानात खेळलेल्या या सामन्यातील क्षण तेंडुलकरने एका व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केले आहेत. निवृत्तीनंतर सचिन लॉर्ड्सवर उतरलेल्या क्षणाला जवळपास 7 वर्षे झालेत. याच सामन्यात आणखी एक किस्सा घडला होता. युवराज सिंग रेस्ट ऑफ वर्ल्ड संघातून खेळला होता. या सामन्या दरम्यानच त्याने क्रिकेटच्या देवाचे पाय धरल्याचे पाहायला मिळाले होते.

Also Read: VIRAL VIDEO : फुटबॉलपटून मैदानावरच केलं प्रपोज

सचिन तेंडुलकरने जो व्हिडिओ शेअर केलाय त्यात आपल्या सहकाऱ्यासोबत तो प्रॅक्टिस करतानाचे क्षणही पाहायला मिळतात. या सामन्यावेळी लॉर्ड्सवर सचिन आणि शेन वॉर्न यांचे कट आउटही लावल्याचे पाहायला मिळाले होते. व्हिडिओमध्ये सचिन या कट आउटसोबत फोटो काढतानाही पाहायला मिळते.

Also Read: स्मृतीनं एका ओळीत सांगितली आयुष्याच्या प्रवासाची कहाणी

जर तुम्हाला ही मॅच आठवत असेल तर शेन वॉर्नच्या नेतृत्वाखालील रेस्ट ऑफ वर्ल्ड संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित 50 षटकात 293 धावा केल्या होत्या. युवराज सिंगने 134 चेंडूत 132 धावा कुटल्या होत्या. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरनेच त्याची विकेट घेतली होती. धावांचा पाठलाग करताना सचिनच्या संघाकडून फिंचने 181, सचिन तेंडुलकर 44 आणि ब्रायन लाराने 23 धावांची खेळी केली होती.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here