काहीजण आपल्या धावपळीच्या वेळेतून वेळ काढून बाहेर फिरायला जरूर जातात. तर काहीजण नवीन ठिकाणी जातात आणि बर्‍याच चांगल्या आठवणी घेऊन परत येतात. भारतात असे बरेचशी ठिकाण आहेत जिथे तुम्ही फिरायला जाऊ शकता. ही ठिकाणे इतकी सुंदर आहेत की दरवर्षी येथे मोठ्या संख्येने पर्यटक पोहोचतात. त्याचबरोबर जर तुम्ही जुलै महिन्याबद्दल बोलत असाल तर ते म्हणजे पावसाळ्याचा हंगाम. त्या मुसळधार पावसामुळे वातावरण खूपच आनंददायी होते, त्यामुळे लोक आपल्या पार्टनरसोबत रोमँटिक क्षण घालवण्यासाठी फिरायला बाहेर पडतात. अशा दिवसात तुम्ही देखील अशीच एखादी जागा शोधत असाल तर, जुलै महिन्यात पार्टनरसोबत रोमँटिक क्षण घालवण्यासाठी तुम्ही कोठे आनंद घेऊ इच्छित आहात? चला तर मग अशा काही सुंदर ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात.

कौसानी:

उत्तराखंडमधील प्रत्येक ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते, त्यातील एक कौसानी आहे. हे ठिकाण जुलै महिन्यात भेट देण्यासाठी अगदी योग्य आहे. येथून तुम्ही हिमालयातील उंच शिखरे पाहू शकता. येथे तुम्ही कौसानी टी इस्टेट आणि रुद्रधारी फॉल्स सारख्या ठिकाणी भेट देऊ शकता. येथे पार्टनरशिवाय तुम्ही तुमच्या मित्रांसह देखील जाऊन भरपूर आनंद घेऊ शकता.

चेरापुंजी:

चेरापुंजी हे ठिकाण सर्वांना आकर्षित करते. येथे तुम्हाला निसर्गाची अनेक अद्भुत दृश्ये, सुंदर धबधबे आणि येथील प्रसन्न वातावरण प्रत्येक कपल ला आकर्षित करते. येथे तुम्ही तुमच्या पार्टनरसह इतर ठिकाणी नोहकालीकाय फॉल्स, सेव्हन सिस्टर्स फॉल्स, नोक्रेक नॅशनल पार्क आणि इको पार्कला भेट देऊ शकता.

माथेरान हिल:

माथेरान हिल हे सर्वात सुंदर ठिकाण आहे. हे ठिकाण महाराष्ट्राच्या पश्चिम घाटावर आहे. येथे तुम्ही तुमच्या पार्टनरसह रोमँटिक क्षण घालवू शकता आणि निवांत क्षण देखील घालवू शकता. येथे तुम्ही माथेरान टॉय ट्रेनचा फेरफटका मारू शकता. याशिवाय प्रबलगड किल्ल्याला भेट देणं हा स्वत: चा वेगळा अनुभव आहे, त्याच बरोबर तुम्ही चालोंट तलावालाही भेट देऊ शकता.

शिमला:

जुलै महिन्यात तुम्ही शिमलालाही भेट देऊ शकता. येथील हवामान बर्‍यापैकी आनंददायी आहे. येथे पार्टनरसह मॉल रोडला भेट दिल्यास स्वतःला एक वेगळा अनुभव मिळतो. कुफरी, चाईल, नरकंडा अशी बरीच ठिकाणे आहेत जिथे तुम्ही तुमच्या पार्टनरसह फिरायला जाऊ शकता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here