लसतुटवड्यामुळे वेग मंदावल्याचा मुंबई पालिकेचा आरोप

मुंबई: भारतात कोरोनाच्या लसीकरणामध्ये महाराष्ट्र राज्याचा वेग पहिल्यापासूनच अव्वल आहे. आतापर्यंत राज्यात ३ कोटींहून अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. यात मुंबईचा मोठा वाटा आहे. १८ वर्षांवरील लसीकरणासाठी पात्र असलेल्या एकूण नागरिकांपैकी ५० टक्के मुंबईकरांनी पहिला डोस घेतला असल्याचा दावा मुंबई पालिकेने केला आहे. लसीकरणासाठी पात्र ठरणारे असे एकूण ९० लाख मुंबईकर आहेत. त्यापैकी ४५ लाख मुंबईकरांनी लसीचा पहिला डोस घेतला असल्याचा दावा मुंबई पालिकेकडून करण्यात आला आहे. तसेच, ११.५ लाख मुंबईकरांचा दुसरा डोसदेखील घेऊन झाला आहे. वर्षाच्या सुरूवातीला लसीकरणाची मोहिम सुरू झाली तेव्हापासूनची ही आकडेवारी आहे. (Mumbai BMC claims 50 percent Mumbaikars have taken their first dose of COVID vaccine)

Also Read: मुंबई पालिका CBSE, ICSE शाळांसाठी देणार 89 लाखांची पुस्तके

सध्या मुंबईतील अनेक लोक इच्छा असूनही लस घेऊ शकत नाहीत. जर लसींच्या डोसची कमतरता भासली नसती तर आतापर्यंत एकूण लसीकरणाचा आकडा आणखी वाढला असता. मुंबई पालिकेची दिवसाला १ ते दीड लाख लोकांना लसीकरण करण्याची क्षमता आहे. लसींच्या डोसची कमतरता भासत असल्यानेच मुंबई पालिकेकडून दिवसाला केवळ ७० हजार डोस देण्यात आले. लस तुटवड्यामुळे पालिकेच्या अखत्यारितील अनेक लसीकरण केंद्रांवर डोस उपलब्ध नसतात. त्याचा फटका मोहिमेला बसतो.

मुंबईकर

Also Read: मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर व्यक्त केली नाराजी

मुंबई पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात पालिकेला साडेसात लाख डोस मिळाले. यंदाच्या महिन्यात हा पुरवठा वाढवण्यात यावा अशी अपेक्षा मुंबई पालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. सध्या लसींच्या तुटवड्यामुळे पालिकेला अपेक्षित पुरवठा होत नाही. जर पालिकेच्या अपेक्षेप्रमाणे लसींच्या डोसचा पुरवठा करण्यात आला तर लस सर्वांना लस देण्याचं लक्ष्य ठरवलेल्या कालावधीपेक्षाही आधी पूर्ण होऊ शकेल, असा विश्वास पालिकेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here