जर तुम्हाला पावसात भिजल्यानंतर काहीतरी खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही कॉर्न सूप चा आस्वाद घेऊ शकता.

पावसाळा सुरू होताच बाजारात काही ठिकाणी कॉर्न दिसू लागतो. आजकाल कॉर्न सगळीकडे सहज उपलब्ध होतो. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा हवामान थोडे थंड होते, त्यावेळी जर गरम सूप पिण्यास मिळाला तर मज्जाच वेगळी. पावसाळ्यात कॉर्न सूप (corn soup)पिण्यास एक वेगळाच आनंद असतो. पाऊस पाहताना आपण घरी बसून कॉर्न सूप पिऊ शकता. हे आरोग्य आणि चव या दोन्हीच्या दृष्टीने खूप चांगले आहे. जर तुम्हाला पावसात भिजल्यानंतर काहीतरी खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही कॉर्न सूप (corn soup)चा आस्वाद घेऊ शकता. (corn soup recipe for rainy season)

Also Read: टेस्टी आणि हेल्दी ‘ब्रोकोली सूप’ करा घरीच; जाणून घ्या रेसिपी

साहित्य :

– कॉर्न – 1 वाटी

– गाजर – १

– कांदा – १

– मैदा पीठ – 2 टिस्पून

– लोणी – 50 ग्रॅम

– काळी मिरी पावडर – अर्धा चमचे

– मीठ – चवीनुसार

– थोडा व्हिनेगर

Also Read: क्रीमी वेजेटेबल सूप बनवण्याची सोपी रेसिपी

कृती :

– सुरवातीला उकडलेले कॉर्न मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

– आता नॉन स्टिक पॅन ठेवा आणि त्यात कॉर्न, गाजर आणि कांदा घालून 10 मिनिटे शिजवा.

– आता या भाज्यांमध्ये कॉर्न पेस्ट घाला आणि थोडावेळ शिजवा.

– आता थोडे व्हिनेगर आणि मीठ घाला. त्यांनतर थोडे पाणी उकळवा.

– हे पाणी भाज्यांमध्ये घाला आणि 2 चमचे सर्व पीठ मिक्स करावे.

– त्यावर काळी मिरीची पूड आणि लोणी घाला आणि थोडावेळ शिजू द्या. ते एकत्र मिसळले की गॅस बंद करा.

– अशाप्रकारे तुमचा कॉर्न सूप तयार आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here