सभागृहातील गैरवर्तनाप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचे झाले निलंबन

Vidhan Sabha Adhiveshan 2021 मुंबई: तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी पावसाळी अधिवेशनाच्या भाजपच्या 12 आमदाराचं वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं. आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले आणि त्यांनी तालिका अध्यक्षांच्या जवळ जाऊन निषेध व्यक्त केला. त्यानंतर, भाजपच्या आमदारांवर निलंबनाची कारवाई केली गेली. या कारवाईवरून विरोधी पक्षाने नाराजी व संताप व्यक्त केला. परंतु, या घटनेवर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आपलं रोखठोक मत मांडलं. (BJP 12 MLA Suspended from Monsoon Vidhan Sabha Adhiveshan Chhagan Bhujbal Reaction)

Also Read: “केवळ १२ नाही तर सर्वच्या सर्व आमदारांवर कारवाई केली तरीही…”

“कालचा प्रकार झाला त्यात मी ठराव मांडला आणि बोलायला हवं होतं. फडणवीसांनी आधी बोलायचं ठरवलं. त्यांना तालिका अध्यक्षांनी परवानगी दिली. मी त्यांच्यासमोर जजमेंट, पत्र दाखलत मुद्दा ठेवला. आपल्याला कोरोनामुळे माहिती गोळा करायला अडचणी आहेत म्हणून केंद्राकडे डेटा मागतोय हे मी सांगितलं. पण तरी फडणवीस उभेच राहिले. अचानक काही तरी झालं आणि गोंधळ सुरू झाला. अध्यक्षांसमोरचा राजदंड पळवण्याचा प्रकार सुरू झाला. रूममध्ये जे झालं ते त्यांनी बाहेर येऊन त्यांनी सांगितलं आणि म्हणून या साऱ्यांना निलंबित करण्यात आलं”, अशी माहिती भुजबळ यांनी दिली.

Also Read: विरोधकांनी मला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या- तालिका अध्यक्ष

“भाजपला कोर्टात जायचं तर जाऊ दे. सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की सभागृहात बेशिस्त वर्तन केलं जातं असेल तर ते धोकादायक आहे आणि त्यावर कारवाई केली पाहिजे. त्यामुळे त्यांना कोर्टाकडून काही दिलासा मिळणार नाही. सभागृह सर्वभौम असतं. त्यांच्या कोर्टात जाण्याचा प्रयत्न योग्य होईल असं मला वाटत नाही. त्यांनी निदर्शने करू दे. जनतेला सांगू दे की त्यांनी काय केलं. सभागृह अध्यक्षांचे काम असंत निर्णय घेणं. तालिका अध्यक्ष असतात तेव्हाही हा प्रकार घडला होता. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई योग्य आहे”, असे मत छगन भुजबळ यांनी मांडले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here