लहान मुलींपासून ते मोठ्या महिलापर्यंत अनेकांना हेल्दी, निरोगी आणि सुंदर केस असावे स्वप्न असते. आपले केस कसे आणि कोणत्या प्रकारचे आहेत, हे मुख्यत्वे आपल्या अनुवांशिकतेवर अवलंबून असते. दुसरीकडे, जर आपण आपल्या केसांची काळजी घेतली तर आपल्याला जसे हवे तसे केस मिळू शकतात. जर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात सभोवताली पाहिले तर असे पदार्थ सापडतील जे आपल्या केसांना नैसर्गिकरित्या वाढण्यास आणि मजबूत ठेवण्यास मदत करतील.

बदाम:

बदाम केसांच्या आरोग्यासाठी उत्तम असतात कारण ते जस्त सारख्या प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांमध्ये समृद्ध असतात. बदामांमध्ये आढळणारे व्हिटॅमिन ई केराटिनचे उत्पादन वाढवून खराब झालेल्या केसांच्या दुरुस्तीसाठी खूप उपयुक्त मानले जाते.

कोरफड:

कोरफडमध्ये (एलोवेरा) प्रोटीओलाइटिक एन्झाईम्सची चांगली मात्रा असते, ज्यामुळे त्वचेच्या मृत पेशी आणि केसांच्या कोशांची दुरुस्ती होऊ शकते, परिणामी केसांची जलद वाढ होते.

केळी:

केळीमुळे आपल्या केसांना पोषण मिळते. तसेच उच्च प्रमाणात कॅल्शियम आणि फॉलिक अॅसिड मिळते. केळी आणि दुध यामध्ये काही काजू, बियाणे, दालचिनी पूड आणि मध घालून एक प्यावे.

मेथी:

मेथीच्या दाण्यांमध्ये फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी तसेच पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोहासारखे आवश्यक खनिजे असतात. हे सर्व पोषक केसांच्या समस्यांवरील उपचारांसाठी आणि केसांच्या वाढीसाठी मदत करतात.

प्रोटीन युक्त आहार:

आपल्या आहारात प्रोटीन युक्त आहार घेतल्यास आपल्या केसांचे आरोग्य उत्तम राहते. अंडी, चिकन, दूध, चीज, शेंगदाणे, दही हे प्रोटीनचे उत्कृष्ट स्रोत आहेत आणि भरपूर प्रमाणात ते सेवन केले पाहिजे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here