बॉलिवूडमधील अभिनेता रणवीर सिंगचा आज 36 वा वाढदिवस. त्याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्याचे चाहते शुभेच्छा देत आहेत.
‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘रामलीला’, ‘गली बॉय’, ‘सिम्बा’ या सुपर हिट चित्रपटांमधून रणवीर प्रेक्षकांच्या भेटीस आला.
2010 मध्ये रणवीरने कॉफी विथ करण या शोमध्ये उपस्थिती लावली होती. त्यावेळी ‘बॅंड बाजा बारात’ या चित्रपटाच्या कास्टिंगचा एक किस्सा करण जोहरने शोमध्ये सांगितला.
करणने सांगितले की, ‘बॅंड बाजा बारात’ या चित्रपटासाठी आदित्य चोप्राने रणवीरला प्रमुख भूमिकेसाठी निवडले होते, पण करणचा रणवीरला चित्रपटात घेण्यासाठी विरोध होता.
हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर करणला रणवीरचे चित्रपटातील काम पाहून धक्का बसला.
करणने सांगितले की तो आदित्य आणि यश जोहर यांच्यासोबत जेवण करण्यासाठी यश राज स्टूडियो येथे गेला होता. त्यावेळी त्याने रणवीरला पहिल्यांदा पाहिले होते. तेव्हा रणवीर टेबल टेनिस खेळत होता.
करणला वाटले की रणवीर असिस्टंट डायरेक्टर आहे. पण नंतर त्याला समजले की तो ‘बॅंड बाजा बारात’ चित्रपटात काम करणार आहे. तेव्हा करण आदित्यला म्हणाला की, ‘हा चित्रपट कोण पाहणार आहे?’
आदित्यने करणला जेव्हा त्या चित्रपटाचा ट्रेलर दाखवला तेव्हा करणच्या लक्षात आले की, रणवीरमध्ये आत्मविश्वास आहे. रणवीरचं दमदार काम पाहून करण म्हणाला, मीच मूर्ख ठरलो.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here