तुम्ही Google Chrome वापरत असल्यास आणि वारंवार नोटिफिकेशनमुळे तुम्हाला त्रास होत असल्यास, ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. येथे आम्ही तुम्हाला एक खास ट्रिक्स सांगणार आहोत जी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.
पुणे : आपण सर्वजण काही माहिती शोधण्यासाठी Google Chrome वापरतो. बर्याच वेळा आपण इंटरनेटवर सर्फिंग करताना अशा वेबसाइटवर पोहोचतो, त्यानंतर आपल्याला विचित्र पॉप-अप नोटिफिकेशन (Notification) मिळू लागतात, ज्याचा आपल्याला काही उपयोग होत नाही. गूगल क्रोमवर (google chrome) आलेल्या नोटिफिकेशन्समुळेही तुम्हाला त्रास झाला असेल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त असेल. येथे आम्ही तुम्हाला एक खास ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याद्वारे आपण वारंवार येणारे नोटिफिकेशन सहजपणे बंद करू शकाल. (how to remove pop up notification in google chrome here complete process)
Also Read: ना मोबाइल ना इंटरनेट, कसा करायचा ब्रीज कोर्स?

Google Chrome मध्ये असे करा नोटिफिकेशन बंद
– कम्पुटरवर आणि लॅपटॉपवर Google Chrome उघडा
– येथे टॉप-राइट जा आणि सेटिंग्ज ओपन करा
– साइट सेटिंग्ज वर जा आणि प्राइवेसी आणि सिक्योरिटी वर जावा
– नोटिफिकेशनवर क्लिक करा
– आता टॉगल ऑन करा, हे वेबसाइटवरून येणार्या सर्व नोटिफिकेशन बंद करेल
– या व्यतिरिक्त तुम्ही Use quieter messaging फीचरचा वापर करुन नोटिफिकेशन ही ब्लॉक करू शकता.
Also Read: ऑनलाइन शिक्षणासाठी केंद्र सरकार पुरवणार मोफत इंटरनेट?

कोणतीही वेबसाइट ब्लॉक करण्यासाठी या गोष्टी करा
कोणतीही वेबसाइट ब्लॉक करण्यासाठी, ब्लॉक सेक्शनवर जा. येथे त्या वेबसाइटचे नाव एंटर करा आणि Add वर क्लिक करा. असे केल्याने वेबसाइट ब्लॉक होईल.
Also Read: आता इंटरनेट नसतानाही वापरू शकता WhatsApp
आपण कोणत्याही वेबसाइटवरून नोटिफिकेशन प्राप्त करू इच्छित असल्यास हे काम करा
– काम्पुटर किंवा लॅपटॉपवर Google Chrome उघडा
– येथे सेटिंग्जवर जा आणि Privacy and security सेक्शनमध्ये जावा
– आता पॉप-अप वर जा आणि रिडायरेक्टमध्ये जाऊन Allow वर क्लिक करा
– असे केल्यावर, आपल्याला वेबसाइट वरून नोटिफिकेशन मिळणे सुरु होईल.
Also Read: Internet एकदम स्लो झालंय? ‘या’ टिप्स वापरुन पहा, मिनिटातच इंटरनेट फास्ट चालेल
गुगलने या वर्षाच्या सुरूवातीस आपल्या यूजर्ससाठी एक खास फीचर सुरू केले आहे. या फीचरद्वारे, यूजर्स Google Chrome ब्राउझरवर स्क्रीन शेयरिंग दरम्यान नोटिफिकेशन्स हाइड करू शकतात. ही माहिती गुगलने आपल्या अधिकृत ब्लॉगद्वारे शेअर केली होती. हे फीचर यूजर्ससाठी खूप उपयुक्त ठरेल असा कंपनीचा विश्वास आहे.
यूजर्स स्क्रीन शेयरिंगमध्ये दिसणार्या नोटिफिकेशन्स बंद करु शकतात. एकदा स्क्रीन शेयरिंग संपल्यानंतर, त्या दरम्यान आलेल्या सर्व नोटिफिकेशन्स डेस्कटॉपवर दिसतील. हे फीचर पॉप-अप नोटिफिकेशन पूर्णपणे बंद करत नाही.
Esakal