दिल्ली विद्यापीठातून कैलाश खेर (delhi university) यांनी पदवी घेतली होती. मात्र लहानपणापासूनच त्यांची अभिरुची संगीतात असल्यानं शिक्षणात त्यांना फार रस नव्हता. (kailash kher) गायक होण्याच्या दिशेनं त्यांनी प्रयत्न सुरु केले. (kailash kher suicide attempt here unknown facts about kailash)
2001 मध्ये कैलाश खेर यांनी मुंबईमध्ये पाऊल ठेवलं होतं. गायक होण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. वयाच्या 4 थ्या वर्षांपासून त्यांनी गायला सुरुवात केली होती. त्याचा फायदा त्यांना झाला.
आपल्याला जेव्हा गायक व्हायचं आहे असं त्यांनी घरच्यांना सांगितलं तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध सहन करावा लागला. घरच्यांना कैलाश यांनी गायक व्हावं असं वाटत नव्हतं. मात्र कैलाश आपल्या निर्णयावर ठाम होते.
मुंबईत आल्यानंतर कोणा एखाद्या निर्मात्याकडून बोलावणं आलं तर त्यांच्याकडे जायचं म्हटल्याल कैलाश यांना समस्या होती ती पैशांची. त्यावेळी ते पायीच प्रवास करुन निर्मात्यांच्या भेटीसाठी जात.
संगीतकार राम संपत यांच्याशी जेव्हा कैलाश यांची भेट झाली तेव्हा त्यांना संगीत क्षेत्रात ब्रेक मिळाला. असं म्हटलं जात. त्यांनी सुरुवातीला जिंगल्स गायला सुरुवात केली.
कैलाश खेर यांनी एक बिझनेस सुरुवात केला होता. मात्र काही कारणास्तव त्यांना मोठ्या तोट्याला सामोरं जावं लागलं. त्यावेळी आपण जे भांड़वल गुंतवले होते. ते वसूल झाले नाही. अशावेळी निराश झालेल्या कैलाश यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here