फलटण शहर (सातारा) : खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर (MP Ranjitsingh Naik-Nimbalkar) यांनी फलटण-लोणंद व त्यानंतर फलटण-पुणे ही फलटणकरांच्या स्वप्नातील रेल्वे प्रत्यक्षात उतरवली. रेल्वे, पाणी, रस्ते, रोजगार निर्मिती अशा विविध कामांच्या पूर्ततेसाठी त्यांनी दोन वर्षात माढा लोकसभा मतदार संघात (Madha LokSabha constituency) हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला आहे. त्यामुळे त्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारामध्ये (Union Cabinet Expansion 2021) समावेश व्हावा, अशी आग्रही मागणी खासदार समर्थकांमधून होत आहे. (Union Cabinet Expansion 2021 Demand For Inclusion Of MP Ranjitsingh Naik-Nimbalkar In The Union Cabinet Satara Political News)

माढा लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते.

रणजितसिंह यांनी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर प्रथम फलटण-लोणंद रेल्वे (Phaltan-Lonand Railway) सुरु केली. नीरा-देवघरचे बारामतीला वळविलेले पाणी बंद करुन ते पुन्हा नीरा उजव्या कालव्यात वळवले. आमदार जयकुमार गोरे (MLA Jaykumar Gore) यांच्या संकल्पनेतून आलेला माण तालुक्यातील 54 गावांना वरदान ठरणाऱ्या जिहेकठापूर प्रकल्पासाठी निधी मिळवण्यात आमदार जयकुमार गोरे यांच्या साथीने खासदार रणजितदादांना यश आले आहे. नीरा-भीमा स्थिरीकरणाचा महत्त्वांकांक्षी प्रकल्पाची सुरुवात होण्यासाठी खासदार रणजीतसिंह विशेष परिश्रम घेत आहेत. नुकतीच फलटण-पुणे रेल्वे सेवा सुरु झाली असून फलटण – पंढरपूर रेल्वेसाठी त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर या रेल्वामार्गचे सध्या सर्वेक्षण सुरु आहे. संपूर्ण माढा लोकसभा मतदार संघातून जाणाऱ्या मुंबई – हैद्राबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी (Mumbai – Hyderabad Bullet Train Project) त्यांनी पाठपुरावा केला असून त्याचे सध्या हवाई सर्वेक्षण चालू आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये कुर्डूवाडी रेल्वे कारखान्यासाठी 32.68 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला. मोडनिंब येथे रेल्वे शेड उभारणी, तसेच मोडनिंब येथे चेन्नई एक्सप्रेसचा थांबा रणजितदादांच्या पाठपुराव्यातून झाला आहे.

Also Read: धक्कादायक! लसीकरण मोहिमेत ‘घोटाळा’, अनेकांकडून पदाचा गैरवापर

माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले. केंद्र सरकारच्या केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी योजनेतून सातारा व सोलापूर जिल्ह्यातील विविध रस्त्यांना भरीव निधीची तरतूद केली. यामध्ये बचेरी – शिंगोर्णी – कटफळ – अचकदाणी रस्त्यासाठी 3 कोटी 45 लाख, फलटण – मांडवखडक – कुरोली, सोनलवाडी-येलमारमांगेवाडी- वाटंबरे – हनुतगाव – सोनंद – घेरडी रस्ता दुरुस्तीसाठी भरीव निधी उपलब्ध केला. दालवडी – उपळवे – वेळोशी- कुळकजाई, रोड (सीतामाई घाट) रस्त्यासाठी 592.65 कोटी, नातेपुते – लोणंद – गिरवी – इस्लामपूर रस्त्यासाठी 9 कोटी 2 लाख. गरवाड-निमगाव ते वेळापूर रस्ता दुरुस्तीसाठी 9 कोटी 79 लाख. टेंभूर्णी येथील शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय राज्यमार्गासाठी रू. 49.72 कोटी, इंदापूर ते तोंडले मधील 46 किमी चौपदरी मार्गासाठी रू. 1601 कोटी टेंभूर्णी ते कुळसंब 73 किमी मार्गासाठी रु. 157.72 कोटी, धर्मपुरी ते लोणंद (संत ज्ञानेश्वर पालखीमार्ग) मधील 49.40 किमी साठी 1412 कोटी आळंदी- पंढरपूर- मोहोळ असा राष्ट्रीय महामार्ग 965 हा 250 किमीचा महामार्ग मंजूर केला आहे.

Also Read: ‘जरंडेश्वर जप्तीबाबत शासनानं फेरविचार करावा, अन्यथा रस्त्यावर उतरू’

MP Ranjitsingh Naik-Nimbalkar

माढा लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी प्रतिनिधित्व केले होते. पवारांच्या मतदार संघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपचा झेंडा फडकविल्याने माढा लोकसभा मतदार संघ देशभरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला होता. रणजितसिंह यांचा दुग्ध व साखर उद्योगाबाबत विशेष अभ्यास आहे. जनतेच्या हितासाठी त्यांनी वेळोवेळी संघर्षाची भुमिका घेतली आहे त्यामुळे त्यांचे पक्षीय योगदान व कार्य लक्षात घेवून त्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश करावा, अशी आग्रही मागणी जनतेतून होत आहे.

Union Cabinet Expansion 2021 Demand For Inclusion Of MP Ranjitsingh Naik-Nimbalkar In The Union Cabinet Satara Political News

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here