महालगाव (जि.औरंगाबाद) : महामारी संकटावर मात करण्यासाठी आपण शासन निर्णयानुसार श्री क्षेत्र सराला बेटाचे गंगागिरी महाराज प्रतिकात्मक दिंडीचे मंदिरास प्रदक्षिणा करुन मंदिरातच पंधरा दिवस मुक्कामी ठेवण्यात येणार आहे. आपल्या २०० वर्षांच्या परंपरेला खंड न पडु देता ही दिंडी काढण्यात आली. आषाढी एकादशी दिवशी आम्ही विठ्ठलाकडे यंदा भरपूर पाऊस पडु दे व जगावर कोरोना महामारीचे संकट टळु दे, अशी प्रार्थना करू, असे महंत रामगिरी महाराज यांनी सांगितले.





Esakal