मंडणगड (रत्नागिरी) : तालुक्यातील पणदेरी धरणाला मुख्य भिंतीत कालव्याच्या मुखाशी मोठी गळती लागून लाल माती मिश्रित पाणी नदीला जावून पोहचले. चार दिवसांपासून पाऊस गायब झाला असताना पाण्याचा गढूळ रंग पाहून परिसरातील नागरिक भयभीत झाले. काही मिनिटातच धरणाला गळती लागल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. घटनेने खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने गळती थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या. धरण परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करून सतर्कतेचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. (large-leak-on-the-main-wall-of-pandere- dam-damage-ratnagiri-marathi-news)






Esakal