उस्मानाबादपासून 46 किलोमीटर अंतरावर असलेल्या नळदुर्ग किल्ल्यातील पाणी महाल प्रेक्षणीय व प्रसिद्ध आहे. हा प्रंचड किल्ला अडीच किलोमीटर घेराचा असून अजूनही सुस्थितीत आहे. या किल्ल्याजवळून वाहणाऱ्या बोरी नदीचे पाणी अडवून त्याचा उपयोग दुर्ग रक्षणासाठी केलेला फक्त येथेच आढळतो. तीन-चारशे वर्षांपूर्वी देखील लष्करी शास्त्र किती पुढारलेले होते, याचा हा सबळ पुरावाच आहे. पावसाळ्यात या पाणी महालावरून पडणाऱ्या पाहण्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटक येतात. (Naldurg fort, famous for its water palace and tourist attractions)







Esakal