निसर्गाकडे मानवाला ‘ऑफर’ करण्यासाठी अनेक खास गोष्टी आहेत. मात्र, लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात खूपच व्यस्त आहेत.

निसर्गाकडे मानवाला ‘ऑफर’ करण्यासाठी अनेक खास गोष्टी आहेत. मात्र, लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात खूपच व्यस्त आहेत. ऑफिस, घरकाम यामुळे ते कायम बिजी असतात. या सगळ्यात आपल्याला वाटत असेल, की दूर कुठेतरी जावून शांत बसावं. मग, आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांविषयी सांगू, जिथं सूर्यास्त आणि सूर्योदय सर्वात सुंदर दिसतो अन् आपलं मनही प्रसन्न करुन सोडतो.
कन्याकुमारी, तामिळनाडू (Kanyakumari, Tamil Nadu) : भारताच्या दक्षिणेकडील टोकावर असणारी कन्याकुमारी सर्वात प्रसिद्ध सूर्यास्त स्थळांपैकी एक आहे. येथील नयनरम्य आणि मोहक दृश्य वर्षभर पर्यटक, छायाचित्रकारांना आकर्षित करतात.
उमियम झील, मेघालय (Umiam Lake, Meghalaya) : आपल्या ईशान्येकडील लोक आपल्या घरांच्या खिडकीतून आकाशाचे हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी स्वत:ला खूप भाग्यवान समजताच. कारण, आकाशातील हे मनोहरी दृष्ट मनाला खूपच समाधान देते. आपण जेव्हा शिलॉंगला भेट द्याल, तेव्हा येथील सूर्योदय-सूर्यास्ताचा जरुर नजारा पहा.
लेह लडाख (Leh Ladakh) : आपण कुठे फिरायला जायचा विचार करत असाल, तर लेह लडाखला जरुर भेट द्या. कारण, येथील निसर्गरम्य वातावरण डोळ्यांचे पारणे फेडल्याशिवाय राहत नाही. येथून सूर्योदय-सूर्यास्ताचा जादुई नजारा स्वर्गापेक्षा काही कमी नाही.
राधानगर बीच, हॅलोक आयलँड, अंदमान (Radhanagar Beach, Havelock Island, Andaman) : अंदमान-निकोबारच्या या बेटांवर जाण्यासाठी सहलीची योजना करत असाल, तर येथील समुद्रकिनार्‍यांना नक्की भेट द्या. हा समुद्रकिनारा आशियातील एक सुंजर समुद्रकिनारा मानला जातो. येथील सूर्यास्ताचे दर्शन ही पर्यटकांसाठी एक पर्वणीच असते.
डल तलाव, श्रीनगर (Dal Lake, Srinagar) : या मंत्रमुग्ध करणाऱ्या तलावातील सूर्यास्ताचे दृश्य एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. येथून सूर्योदय आणि सूर्यास्ताची छबी खूपच रेखीव आणि सुंदर दिसते. या सरोवरात तरंगणाऱ्या हाऊसबोट्सच्या खिडक्यांतून सूर्योदय-सूर्यास्ताचे दृश्य आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाईल.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here