प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ची लोकप्रियता प्रचंड आहे. या शोचा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या शोचे सूत्रसंचालक प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते महेश मांजरेकर यांनी काही दिवसांपुर्वी या नव्या सिझनची घोषणा केली होती. या सिझनची घोषणा झाल्यानंतर अनेक मराठी कलकारांची नावं शोमधील स्पर्धक म्हणून चर्चेत येत आहेत…

अभिनेत्री नेहा खानला ‘देवमाणूस’ या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. आता नेहा स्पर्धक म्हणून ‘बिग बॉस मराठी 3’ मध्ये येणार आहे, अशी चर्चा आहे.
‘अग्गा बाई सासू बाई ‘आणि ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री तेजश्री प्रधानला बिग बॉसच्या घरात पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील अंजलीची भूमिका साकारणारी अक्षया देवधर बिग बॉसच्या घरात जाणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
‘का रे दुरावा’ या मालिकेमधून विशेष प्रसिद्ध मिळवणारा अभिनेता सुयश टिळक सध्या शुभमंगल ऑनलाईन या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पण तो बिग बॉसच्या या नव्या सिझनमध्ये भाग घेणार आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे. काही दिवसांपुर्वी अक्षया आणि सुयशच्या अफेअरची चर्चा सुरू होती. त्यामुळे आता हे दोघे बिग बॉसमध्ये एकत्र दिसणार का? याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण होत आहे.
अभिनेता संग्राम समेळ आणि
पल्लवी पाटील हे काही महिन्यांपूर्वीच दोघं विभक्त झाले. आता यांच्या नावाची चर्चा बिग बॉस सिझन 3 साठी होत आहे.
मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री पल्लवी सुभाष लवकरच बिग बॉसमध्ये येईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनाया ही भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री रसिका सुनिल बिग बॉसच्या घरात येणार येणार अशी चर्चा सध्या सुरू आहे.
वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री केतकी चितळे बिग बॉसमध्ये येणार आहे अशी चर्चा आहे. केतकी आंबटगोड, तुझं माझं ब्रेक अप या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.
‘काहे दिया परदेस’ मालिकेतील शिव म्हणजेच अभिनेता ऋषी सक्सेना अभिनेत्री इशा केसकरसोबत रिलेशनशीपमध्ये आल्यापासून चर्चेत आहे. आता त्याच्या नावाची चर्चा बिग बॉसच्या नव्या सिझनसाठी होत आहे.
अभिनेता चिन्मय उदगीरकर बिग बॉसमध्ये एन्ट्री घेणार आहे असे म्हणले जात आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here