कुडाळ – जगात एकही राष्ट्र हिंदू नाही.नेपाळ सुद्धा नाही. त्यामुळे प्रत्येकाने नागरिकत्व कायद्याचा सन्मान करणे गरजेचे आहे. छुप्या अजेंड्यामुळे भारतात येणाऱ्या घुसखोरामुळे गेली सत्तर वर्षे त्याचे परिणाम भारत देश भोगत असल्याचे प्रतिपादन बजरंग दलाचे माजी संयोजक उमाकांत गायकवाड यांनी आज नागरिकता दुरुस्ती कायदा अंतर्गत आयोजित समर्थन मोर्चा प्रसंगी केले. या मोर्चात भारत देशाचा सन्मान असणारा तीनशे फुटी तिरंगा छत्रपती शिवाजी महाराज व भारतमाता यांची प्रतिमा हे खास आकर्षण होते.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी नाराज भास्कर जाधवांना केला फोन अन् म्हणाले….
देशप्रेमी नागरिक मंच कुडाळच्या वतीने नागरिकता दुरुस्ती कायदा गैरसमज आणि वास्तव समर्थन मोर्चाचे आयोजन आज कृष्णा सुपर मार्केट ते तहसीलदार कार्यालयपर्यंत करण्यात आले होते. मोर्चापूर्वी बजरंगाचे माजी संयोजक उमाकांत गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. या मोर्चात माजी आमदार राजन तेली, जिल्हा अध्यक्ष सुमेधा नाईक, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, नगराध्यक्ष ओंकार तेली, संध्या तेरसे, विवेक मुतालिक आदि उपस्थित होते.

News Story Feeds