ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण, बुधवारी सकाळी त्यांचे निधन झाले. 29 जूनला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

‘मशाल’मध्ये तर त्यांनी पत्रकाराची भूमिका साकारली होती.
1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या क्रांती या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या चित्रपटातील मेरे देश की धरती हे गाणे खूप लोकप्रिय झाले.
दिलीप कुमार यांचा सर्वात गाजलेला चित्रपट म्हणजे मुघल- ए- आजम.
१९९८ मध्ये आलेला ‘किला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
राना सिनेमाचे शूटींग करताना दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.
दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ साली पाकिस्तानमध्ये झाला होता. त्यांचं खरं नाव युसूफ खान होतं. मात्र बॉलिवूडमध्ये येण्याआधी त्यांनी त्यांचं नाव बदलून दिलीप कुमार असं केलं. एका निर्मात्याच्या सांगण्यावरून त्यांनी नाव बदललं होतं. त्यानंतर चाहते त्यांना दिलीप कुमार म्हणून ओळखू लागले.
‘ज्वार भाटा’ या सिनेमातून १९४४ मध्ये त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले.
दिलीप कुमार यांचं सुरुवातीचं शिक्षण नाशिकमध्ये पार पडलं. त्यानंतर त्यांनी सिनेसृष्टीत येण्याचा निर्णय घेतला.
बाबूल’, ‘दीदार’ ‘मुगल-ए-आझम’ , ‘आन’ ‘गंगा-जमुना’, ‘मधुमती’, ‘देवदास’ अशा कितीतरी सिनेमांची नावे घेतला येतील. ‘मुगल-ए-आझम’ या सिनेमातील सलीम हा तर त्यांनी अजरामर केला.

दिलीप कुमार यांना मिळालेले पुरस्कार हादेखील चर्चेचा विषय आहे. कारण त्यांनी मिळवलेल्या पुरस्कारांची नोंद गिनिज बुकात झाली आहे.

फिल्मफेअर पुरस्कारात १९ वेळा नामांकने मिळवणारेही ते एकमेव अभिनेते होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here