सिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाचा वाद आता चांगलाच पेटला आहे.  प्रकल्प राहणार की जाणार यावरून शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे. नाणारचे समर्थन करणाऱ्या विभागप्रमुखावर शिवसेनेने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ कोकणातील सागवेसह विभागातील २२ शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

हे पण वाचा – कोल्हापूरातल्या दोन खासदारांमध्ये विमानतळावरून खडाखडी….

नाणार रिफायनरी प्रकल्पाचे संघटनेच्या नियमानुसार शिवसेना सागवे विभागप्रमुख राजा काजवे यांनी समर्थन केले होते. त्यामुळे त्यांची विभागप्रमुखपदावरुन जिल्हाप्रमुखपदी उचलबांगडी केली होती. या कारवाईच्या निषेधार्थ विभागातील शाखाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी सामुहीक राजीनामे दिले आहेत.

No photo description available.

No photo description available.

हे पण वाचा – महाराजांची मिरवणूक संपताच पिता-पुञ जवानांनी विझवली घरामध्ये लागलेली आग…

दरम्यान शिवसेनेने पहिल्यापासूनच या प्रकल्पाला विरोध केला आहे. असे असतानाच नाणार प्रकल्पाबाबतची सामनामध्ये जाहिरात छापून आली. त्यामुळे काही नेत्यांनी शिवसेनेच्या भूमिकेवरच शंका उपस्थित केली. मात्र, कोकण दाैर्यावर आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची भूमिका जाहीरातदार ठरवत नसून ती शिवसेना प्रमुख ठरवितात. आमचा याआधीही नानारला विरोध होता आणि आताही तो राहील अशी भूमिका मांडली होती. त्यामुले तो वाद शमला होता. परंतु, आता पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने या वादाला नवे वळण मिळाले आहे.

कोकणात हा प्रकल्प होऊ नये यासाठी शिवसेनेनेही आंदोलने केली होते. त्यानंतर हा प्रकल्प रायगडला हलवण्यात येणार असल्याची घोषणाही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या प्रकल्पामुळे पर्यावरणाला हानी पोहोचू शकते, असे वाटल्याने स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता.

News Item ID:
599-news_story-1582200328
Mobile Device Headline:
ब्रेकिंग – शिवसेनेत उभी फूट; २२ शाखाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
Appearance Status Tags:
Resignation of shiv sena 22 branch head on nanar refinery issueResignation of shiv sena 22 branch head on nanar refinery issue
Mobile Body:

सिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाचा वाद आता चांगलाच पेटला आहे.  प्रकल्प राहणार की जाणार यावरून शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे. नाणारचे समर्थन करणाऱ्या विभागप्रमुखावर शिवसेनेने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ कोकणातील सागवेसह विभागातील २२ शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

हे पण वाचा – कोल्हापूरातल्या दोन खासदारांमध्ये विमानतळावरून खडाखडी….

नाणार रिफायनरी प्रकल्पाचे संघटनेच्या नियमानुसार शिवसेना सागवे विभागप्रमुख राजा काजवे यांनी समर्थन केले होते. त्यामुळे त्यांची विभागप्रमुखपदावरुन जिल्हाप्रमुखपदी उचलबांगडी केली होती. या कारवाईच्या निषेधार्थ विभागातील शाखाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी सामुहीक राजीनामे दिले आहेत.

No photo description available.

No photo description available.

हे पण वाचा – महाराजांची मिरवणूक संपताच पिता-पुञ जवानांनी विझवली घरामध्ये लागलेली आग…

दरम्यान शिवसेनेने पहिल्यापासूनच या प्रकल्पाला विरोध केला आहे. असे असतानाच नाणार प्रकल्पाबाबतची सामनामध्ये जाहिरात छापून आली. त्यामुळे काही नेत्यांनी शिवसेनेच्या भूमिकेवरच शंका उपस्थित केली. मात्र, कोकण दाैर्यावर आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची भूमिका जाहीरातदार ठरवत नसून ती शिवसेना प्रमुख ठरवितात. आमचा याआधीही नानारला विरोध होता आणि आताही तो राहील अशी भूमिका मांडली होती. त्यामुले तो वाद शमला होता. परंतु, आता पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने या वादाला नवे वळण मिळाले आहे.

कोकणात हा प्रकल्प होऊ नये यासाठी शिवसेनेनेही आंदोलने केली होते. त्यानंतर हा प्रकल्प रायगडला हलवण्यात येणार असल्याची घोषणाही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या प्रकल्पामुळे पर्यावरणाला हानी पोहोचू शकते, असे वाटल्याने स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता.

Vertical Image:
English Headline:
Resignation of shiv sena 22 branch head on nanar refinery issue
Author Type:
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags:
नाणार, Nanar, विभाग, Sections, कोकण, Konkan, सिंधुदुर्ग, Sindhudurg, कोल्हापूर, पूर, Floods, विमानतळ, Airport, आग, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, पर्यावरण, Environment
Twitter Publish:
Meta Keyword:
Resignation of shiv sena 22 branch head on nanar refinery issue
Meta Description:
Resignation of shiv sena 22 branch head on nanar refinery issue
नाणारचे समर्थन करणाऱ्या विभागप्रमुखावर शिवसेनेने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ कोकणातील सागवेसह विभागातील २२ शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.
Send as Notification:

News Story Feeds

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here