सातारा : डोंगररांगात झालेल्‍या मुसळधार पावसामुळे (heavy rain) सातारकरांचा जलदूत असणारा कास तलाव यंदा पंधरा दिवस अगोदरच पूर्ण क्षमतेने भरला आहे. यामुळे पुढील एक वर्षासाठी सातारकरांची पाण्‍याची चिंता मिटली असून, त्‍याठिकाणच्‍या पाणीसाठ्याचे नुकतेच नगराध्‍यक्षा माधवी कदम (Mayor Madhavi Kadam), तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी पूजन केले. शहराच्‍या बहुतांश भागाला कास तलावातून (Kaas Lake) पाणीपुरवठा करण्‍यात येतो. (Lake Kaas Has Abundant Water Reserves Satara Marathi News)

या तलावाच्‍या सांडव्‍याच्‍या भिंतीची उंची वाढविण्‍याचे काम पालिकेने हाती घेतले असून, हे काम सध्‍या अंतिम टप्‍प्‍यात आहे.

या तलावाच्‍या सांडव्‍याच्‍या भिंतीची उंची वाढविण्‍याचे काम पालिकेने हाती घेतले असून, हे काम सध्‍या अंतिम टप्‍प्‍यात आहे. हे काम पूर्ण झाल्‍यानंतर कास तलावाच्‍या पाणीसाठवण क्षमतेत वाढ होणार असून, परिणामी सातारकरांना आणखी जास्‍त प्रमाणात पाणी उपलब्‍ध होणार आहे. मध्‍यंतरीच्‍या काळात तलाव परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे तलावातील पाणीसाठ्यात वाढ होऊन तो ओसंडून वाहू लागला. तलाव पूर्ण क्षमतेने भरल्‍याने त्‍यातील पाणीसाठ्याचे पूजन प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही पालिकेच्‍या पदाधिकाऱ्यांच्या हस्‍ते करण्‍यात आले.

Also Read: ‘ठरावाचं अवमूल्यन करणाऱ्या नगराध्यक्षांविरोधात कारवाई करा’

Mayor Madhavi Kadam

या वेळी नगराध्‍यक्षा माधवी कदम, उपाध्‍यक्ष मनोज शेंडे, पाणीपुरवठा सभापती सीता हादगे, नगरसेवक राजू भोसले, स्‍नेहा नलावडे, सुजाता राजेमहाडिक, स्‍मिता घोडके, संगीता आवळे व नगरसेवक उपस्‍थित होते. पूजनानंतर कदम म्‍हणाल्‍या, गेल्या वर्षीपेक्षा १५ दिवस अगोदर तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, त्‍यामुळे सातारकरांची पाण्‍याची चिंता मिटली आहे. तलावाच्‍या भिंतीची उंची वाढविण्‍याचे कामही अंतिम टप्‍प्‍यावर असून, ते पूर्ण झाल्‍यानंतर पाणीसाठ्यात दुपटीने वाढ होणार आहे. या वेळी मनोज शेंडे, सीता हादगे यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले.

Lake Kaas Has Abundant Water Reserves Satara Marathi News

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here