सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अहमदनगर : जिल्ह्यातील नवीन कोरोना (Corona) बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज नवीन रुग्ण (Patient) आढळून येण्याची वाटचाल आता पाचशेच्या टप्प्याच्या दिशेने सुरू झाली आहे. कोरोनाचे मंगळवारी (ता. सहा) नवीन ४७५ रुग्ण आढळून आले आहेत. सहा रुग्णांचा (Patient) मृत्यू (Died) झाला आहे.

Also Read: कोरोनामुळे अहमदनगर शहरात कडकडीत नि”र्बंद”, कापडबाजारात शुकशुकाट

कोरोनाच्या निर्बंधामुळे उन्हाळ्यात विवाह समारंभ झाले नाही. जून महिन्यापासून निर्बंध उठविल्यानंतर विवाह समारंभ धुमधडाक्‍यात प्रारंभ झाला आहे. विवाहासाठी ५० व्यक्‍तींना उपस्थित राहण्यास परवानगी आहे. प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक व्यक्‍ती या समारंभासाठी उपस्थित राहत आहेत. त्यातून मास्कचा वापर न करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे असे प्रकार अनेक ठिकाणी घडत आहेत. रुग्ण वाढीमध्ये हे एक महत्त्वाचे कारण ठरत आहे.

Also Read: बापरे ! अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 80 हजारांवर

जिल्ह्यात आढळून आलेल्या ४७५ रुग्णांपैकी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत २१, खासगी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत १९४ तर अँटिजेन चाचणीत २६० नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

श्रीगोंदे तालुक्‍याने रुग्ण संख्येत जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. श्रीगोंद्यात ६६ तर संगमनेरमध्ये ५० रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्‍यात रुग्ण संख्येने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. नगर शहरात २४ रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या दोन लाख ८२ हजार ५२८ झाली आहे. उपचार सुरू असणाऱ्यांची संख्येने अडीच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दोन हजार ५५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनातून बरे झालेल्या ४०१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत दोन लाख ७४ हजार २९ रुग्ण बरे झाले आहेत.

Also Read: आमदारांपेक्षा आम्ही जास्त कामं केली; अहमदनगर झेडपी सभापती काशिनाथ दाते

तालुकानिहाय रुग्ण संख्या याप्रमाणे

श्रीगोंदे ६६, संगमनेर ५०, पारनेर ४८, पाथर्डी ४१, राहुरी ३९, कर्जत ३१, राहाता ३०, नगर तालुका २६, नगर शहर व नेवासे प्रत्येकी २४, जामखेड २३, शेवगाव २१, कोपरगाव १९, अकोले १३, श्रीरामपूर १२ तर बाहेरील जिल्ह्यातील आठ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here