अभिनेता सुयश टिळकने सोशल मीडियावर त्याच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत. सुयशने आयुशी भावे हिच्याशी साखरपुडा केला आहे. अनेकांना प्रश्न पडला असेल की सुयशची होणारी पत्नी कोणआहे? जाणून घेऊयात आयुशीबद्दलची खास माहिती…

आयुषी भावे ही अभिनेत्री आणि डान्सर आहे. आयुषी एका आगामी सिनेमात दिसणार आहे.
आयुषी 2018 मध्ये महाराष्ट्राची ‘श्रावणक्वीन’ या किताबाची मानकरी ठरली होती.
आयुषी ‘युवा डान्सिंग क्विन’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.
आयुषीच्या ‘या गावचं की त्या गावचं’ या लावणीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
आयुषीने सुयश आणि तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिले, ‘तो हॅपी बर्थडे म्हणाला आणि मी होकार दिला.’

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here