सासवड : टाळ – मृदंगाचा निनाद आणि निवडक दिंड्या – वारकरी यांची उत्साही उपस्थिती.. ढगाळ वातावरण व मंद वाऱयाच्या झुळका अंगावर झेलत… लोकरंग व भक्तीरंगात श्री. संत सोपानदेवांच्या पादुका पालखीत ठेवून पंढरीच्या आषाढवारीचा प्रस्थान सोहळा आज भक्तीमय झाला.
खरे तर संत ज्ञानेश्वरांच्या पालखीतील लाखभर वारकरी सोपानदेवांना पंढरीकडे निरोप देण्यासाठी असतात, मात्र यंदा दुसरे वर्ष असे की.. कोरोना नियम पाळून वारीला मुरड घालावी लागली आहे.
प्रस्थान सोहळा ज्येष्ठ वद्य द्वादशी दिवशी (6 जुलै) सासवडला देऊळवाड्यात मंदिरात व देऊळवाड्यात फुलांची सजावट केली होती. समाधीवर पहाटे स्नान पूजा, अभिषेक झाला. सारा उत्साह व उत्सवी थाट असला तरी कोरोना नियम पाळून सारे दरवाजे बंदीस्त ठेवून पोलीस बंदोबस्तात प्रस्थान सोहळा रंगला.
यंदाही शासन आदेशानुसार पायी वारीला परवानगी नसल्यामुळे गतवर्षी प्रमाणे बसमधूनच निवडक वारकरी श्री.संत सोपानदेवांच्या पादुका घेऊन आषाढवारी करतील. त्यासाठीचा प्रस्थान सोहळा काल (6 जुलै) सासवडला देऊळवाड्यात झाला.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here