काही अपवाद सोडले तर चॉकलेट (chocolate) हा लहान-थोरांपासून सर्वांचाच आवडीचा पदार्थ. आपण आनंदाचे अनेक क्षण साजरे करतो. त्या क्षणांचा आनंद आपण चॉकलेट खाऊन नक्कीच द्विगुणित केला असणार. एखाद्या सेलिब्रेशनमध्ये केक किंवा पेस्ट्रीसारखे चॉकलेट्स नसतील तर ते सेलिब्रेशनच अपुरेच वाटते. याच चॉकलेटच्या आठवणीत दरवर्षी ७ जुलैला जगभरात ‘चॉकलेट-डे’ (World Chocolate Day 2021) साजरा केला जातो. चला तर पाहुयात जगातील सर्वात महागडी चॉकलेट्स (World Chocolate Day 2021 world most expensive chocolate) –

नोका चॉकलेट – हे चॉकलेट एक कॅनडियन कंपनी बनवते. तसेच हे जगातील सर्वात महागडं चॉकलेट असल्याचे फोर्ब्स मॅगझिनमध्ये देखील नोंद झाली होती. या चॉकलेटची किंमत ३३० डॉलर म्हणजे तब्बल २४६०२.२१ रुपये आहे.
ग्रुअर अॅफिसिओनॅडो यांच्या कलेक्शेनमधील चॉकलेट : हे जगातील सर्वात महागडं चॉकलेट असून याची किंमत २७० डॉलर प्रति बॉक्स आहे.
डेल्फी एडीबल गोल्ड क्रिएशन – हे देखील महागडं चॉकेटल असून एका बॉक्समध्ये ८ चॉकलेट येतात. त्याची किंमत ही ३९७ डॉलर इतकी आहे. या बॉक्समध्ये स्वीस गोल्ड कॉईन देखील असतो.
ब्राऊनी एक्स्ट्राऑर्डनरी – हे डार्क चॉकलेट असून यासोबत वाईन देखील देतात. याची किंमत ही १००० डॉलर आहे.
व्होसजेस हॉट चॉकलेट – खास स्टेट्स आणि फ्लेवरसाठी जगप्रसिद्ध असलेल्या या चॉकलेटची किंमत ६२०० रुपये आहे.
व्हिस्पा गोल्ड व्रॅप्ड चॉकलेट – हे चॉकलेटमध्ये गोल्ड असतं. तसेच या चॉकलेटचं लिमिटेड एडीशन १२८०.२८ युएस डॉलर किंवा ९६१.४८ पाऊंडला विकले जाते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here